3 May 2024 9:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

वाझेंनी नाव फोडलेले ‘नंबर वन’ साहेब देशमुख नव्हे तर परमबीर सिंग? | मग संभ्रम पसरवतंय कोण?

Sachin Vaze

मुंबई, १४ जुलै | मुंबई पोलिस दलातील निलंबित आणि विवादित अधिकारी सचिन वाझे याने सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे मोठे खुलासे केल्याचं सांगण्यात येत आहे. अशावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील अॅड. कमलेश घुमरे यांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझे प्रकरणात काही आरोप केले आहेत. त्यात सचिन वाझे यांनी नाव फोडलेले ‘नंबर वन’ साहेब अनिल देशमुख नाही, तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग असल्याचा आरोप घुमरे यांनी केलाय. अनिल देशमुख हे परमबीर सिंग यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार होते. मात्र ते राहून गेलं. आधी त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आम्ही पुढे आलो, असंही घुमरे यांनी म्हटलंय.

सचिन वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या कमिशनसमोर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या ठिकाणी सचिन वाझे याने प्रतिज्ञापत्र सादर केलंय. त्यात तो काही बोलत नाही. त्यात तो 4 कोटी 70 लाख रुपयांबाबत काही बोलत नाही. अनिल देशमुख यांना भेटल्याचंही वाझे सांगत नाही. आपण फक्त जानेवारीमध्ये एकदाच भेटल्याचं सांगत वाझे सांगत असल्याचंही घुमरे म्हणाले. ईडी आणि सीबीआय जेव्हा जबाब घेतात तेव्हा त्यांचा माणूस तिथे असते. मात्र, आयोगासमोर मोकळ्या वातावरणात प्रतिज्ञापत्र दिलं आहे, असंही घुमरे म्हणाले.

आयोगासमोर आलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहिती:
आयोगासमोर आलेल्या प्रतिज्ञापत्रात सचिन वाझे याने पैसे दिले असं सांगत नाही. सचिन वाझे यांनी दिलेला जबाब हा दबावाखालीच असावा. अधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब दबावाखालीच असतो. CRPC मध्ये पोलिसांसमोर दिलेल्या जबाब स्वीकारला जात नाही. 100 कोटी रुपयांचा आरोप खोटा आहे. बारची संख्याही विसंगत आहे, असा दावाही घुमरे यांनी केलाय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Advocate Kamlesh Ghumre clarification on statement regarding Number One Saheb news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x