26 May 2022 7:23 PM
अँप डाउनलोड

म 'मदतीचा' नाही तर म 'मार्केटिंगचा; पुर परीस्थितीत सुद्धा भाजपकडून जाहिरातबाजी

BJP Maharashtra, Kolhapur Flood, Sangali Flood

मुंबई : भारतीय जनता पक्ष कोणत्या विषयावर मार्केटिंग आणि जाहिरातबाजी करेल याचा नेम नाही. सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्त लोकांच्या मदतीला अनेकजण धावून येत असले तरी सर्वांचं लक्ष हे मदत लवकरात लवकर कशी पोहोचेल यावर आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी सरकारी निधीतील मदतीच्या वस्तूंवर देखील स्वतःचे मार्केटिंग करण्यासाठी खास लेबल छापून ते पाकिटांवर लावण्यावर आधी भर देत आहेत.

प्रत्येक विषयात मार्केटिंग करण्याचा त्यांच्या मोदी मंत्र ते तंतोतंत जपताना दिसत आहेत. एवढ्या पावसात देखील कागदी लेबल आधीच छापून ते अन्नधान्यांच्या पाकिटांवर लावण्यात येत आहेत. वेळेपेक्षा मार्केटिंग अधिक महत्वाचं असल्याचं भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधींना वाटत असल्याची खंत पूरग्रस्तांना बोलून दाखवली आहे.

कोल्हापूर अन् सांगलीतील पूरस्थितीने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत कशी पोहोचवता येईल यावर अनेकांनी लक्ष केंद्रित केलं आहे. कोल्हापूरकरांच्या घरातील पाणी पाहून अवघ्या मराठीजनांचे डोळे पाणावले आहेत. आज संपूर्ण महराष्ट्र सह्याद्रीच्या मदतीला धावून जाताना दिसत आहे. समाज माध्यमांवर या मदतीचा माईलस्टोन ठरत असून केवळ आपली मदत पूरग्रस्त बांधवांपर्यंत पोहोचावी हा उद्देश ठेऊन सामाजिक संस्था, संघटना आणि नेटीझन्स पुढाकार घेत आहेत.परंतु, स्वत:ची जबाबदारी अन् कर्तव्य असलेल्या सरकारने चक्क जाहिरातबाजी करुन पूरग्रस्तांना मदत दिली आहे.

राज्य सरकारने कोल्हापूर अन् सांगलीतील पूरग्रस्तांना गहू आणि तांदूळ स्वरुपात अन्नधान्य दिले आहे. पीडितांची भूक भागविण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. परंतु, सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या या मदत पॅकेटवरही शासनाने जाहिरातबाजी केली आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या या गहू आणि तांदुळाच्या पॅकींगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर छापण्यात येत आहेत. तसेच, स्थानिक पुढारी समिर शिंगटे आणि सुधाकर भोसले यांचीही नावे टाकून जाहिरातबाजी करण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x