3 May 2024 6:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Health Benefits | चिकन खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का? - नक्की वाचा

Health benefits of chicken

मुंबई, 22 जुलै | चिकन मधून शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि अत्यल्प प्रमाणात मेद शरीराला मिळते. 100 ग्रॅम भाजलेल्या चिकन मधून 31 ग्राम प्रोटीन मिळते. त्यामुळे आपली शरीरयष्टी सुधारण्यासाठी आणि पिळदार शरीरासाठी हे नक्कीच फायदेशीर आहे. या लेखात आपण चिकन खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ.

स्नायू बळकट होतात:
मांसहारातून शरीराला प्रोटीनचा पुरवठा करणारा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चिकन होय. कमी मांस असलेल्या चिकन मधून शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि अत्यल्प प्रमाणात मेद मिळते. 100 ग्रॅम भाजलेल्या चिकन मधून 31 ग्रॅम प्रोटीन मिळते. त्यामुळे शरीर बळकट होण्यास मदत होते.

हाडे बळकट होतात:
प्रोटीन प्रमाणेच चिकन मधून फॉस्फरस, कॅल्शियम यासारखी आवश्यक मिनरल्सचा पुरवठा होतो. त्यामुळे हाडं बळकट होतात. चिकन मधील सेलेनियम घटक सांधेदुखीची समस्या कमी करते.

ताणतणाव कमी होतो:
विटामिन बी 5 आणि ट्रापटोफन (tryptophan) चिकन मधून मिळणाऱ्या दोन घटकांमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभरातील थकवा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे थकवा दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा चविष्ट चिकनची चव चाखायला काहीच हरकत नाही.

पीएमएसच्या समस्या कमी होतात:
चिकन मधून मिळणारे मॅग्नेशियम घटक पी एम एस या पाळी संबंधित समस्यांवर मात करण्यास मदत करते तसेच या दिवसात होणारे मूड स्विंग्स टाळण्यासाठी मदत होते.

टेस्टोस्टेरोन ची पातळी वाढवते:
चिकन मधून मिळणारे झिंक घटक पुरुषांमध्ये टेस्टोस्टिरॉन ची पातळी वाढवण्या सोबतच शुक्राणूंची संख्या देखील वाढण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते:
सर्दी खोकला आणि इतर श्‍वसनाच्या विकारांमध्ये चिकन सूप अत्यंत फायदेशीर आहे. हे सूप गरम पिल्यास चोंदलेले नाक आणि घशातील खवखव कमी होते.

संसर्गापासून बचाव:
तसेच संसर्गापासून बचाव पासून आराम मिळतो.एका संशोधनातून पुढे आलेली बाब म्हणजे चिकन सूप न्यूट्रोफिल्स या इमू सेल्सचे स्थलांतर रोखते. परिणामी संसर्गजन्य रोगापासून आपला बचाव होतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते.

हृदयाचे आरोग्य सुधारते:
चिकन मध्ये विटामिन बी6 मोठ्या प्रमाणात असल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी करण्यास मदत होते. या विटामिन मुळे होमो सीस्टाइन ची पातळी कमी होते परिणामी हृदयविकाराचे प्रमाणही मंदावते. याचसोबत चिकन मधून मिळणारे नायसीन घटक कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनने च्या संशोधनानुसार रेडमीट खाण्याऐवजी चिकन खाणे हा एक हेल्दी उपाय आहे. त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट कमी असते तसेच ओमेगा थ्री फॅटी ऍसिड चा मुबलक पुरवठा होतो. त्यामुळे हृदयाचे कार्य सुधारते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Health benefits of eating chicken in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x