6 May 2024 8:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Health First | कानामध्ये येणारी खाज कधी ठरते चिंंतेचा विषय ? - नक्की वाचा

Causes of ear itching

मुंबई, २४ जुलै | काही वेळेस अचानक कानामध्ये खाज येते. त्याला कमी करण्यासाठी खाजवण्याचा मोह प्रत्येकालाच होतो. मात्र काहीवेळेस खाज अतिप्रमाणात जाणवल्यास हाताजवळ सापडणारी कोणतीही बारीक आणि कानात जाणार्‍या गोष्टीची मदत घेतली जाते. त्याच्या सहाय्याने खाज कमी केली जाते. मात्र अणुकुचीदार गोष्टींचा कानामध्ये वापर केल्यास कानांच्या आतील भागाला इजा होण्याची शक्यता असते.

सतत कानामध्ये खाज येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता नेमके कारण जाणून घेणेदेखील गरजेचे आहे. म्हणूनच अशाप्रकारे कानामध्ये खाज येणे कितपत गंभीरतेने घ्यावे याबाबत विचार करणेदेखील आवश्यक आहे. म्हणूनच तज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला तुम्हांला त्यामागील नेमके कारण जाणून घेण्यास फायदेशीर ठरेल.

कानामध्ये खाज येण्यामागे कानातील मळ तसेच कानाच्या पोकळीमधील डॅन्डरफ हेदेखील कारण आहे. काही जणांमध्ये फंगल इंफेक्शन, कानामधील इंंफेक्शन किंवा अगदी पित्तामुळेदेखील खाज येऊ शकते. काही वेळेस कानामध्ये काही गोष्टी घातल्यास हा त्रास कमी होतो. तर कानांतील खाज हा काहींसाठी एक मानसिक समस्येचा प्रकारही असू शकतो.

कानामध्ये टुथपिक थेट घालणे किंवा कापसाचा बोळा गुंडाळून घालणे त्रासदायक ठरू शकते. तसेच चावी, हेअर पिन, टोकदार नखं घालणेदेखील घातक आहे. यामुळे कानाच्या पडद्याचे नुकसान होऊ शकते. क्वचित कानामध्ये खाज येत असल्यास हे फारसे चिंतेचे कारण नाही. मात्र वारंवार हा त्रास जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित कानामध्ये विशिष्ट प्रकारचे इंफेक्शन आढळून येऊ शकते.

कानामधील खाज कमी करण्यासाठी करंगळीच्या मांंसल भागाचा वापर करावा. बोटाचे नख कापलेले आणि फाईल केलेले असणे आवश्यक आहे. म्हणजे कानामध्ये त्याचा त्रास होणार नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Causes of ear itching in Marathi news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x