2 May 2024 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

यासाठीच राणेंना केंद्रात मंत्रिपद? | चिपळूण पाहणी दौऱ्यात सत्तेची मागणी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मुख्यमंत्र्यांचा अनादर

Narayan Rane

मुंबई, २६ जुलै | कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थितीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी दौरे काढले. या दाैऱ्यात सर्वच नेत्यांनी मदतीच्या आश्वासनांचा ‘पूर’ आणला. मात्र प्रत्यक्षात आपत्तीग्रस्तांसाठी मदत किती व केव्हा मिळणार याबाबत मात्र कुणीही स्पष्टपणे सांगितले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री अनिल परब व सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत व शिवसेना खासदार विनायक राऊत होते. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी रायगड जिल्ह्यातील तळिये या दरडग्रस्त गावाला काल सकाळी भेट दिली. त्यांच्यासोबत विधिमंडळातील दाेन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर होते.

वादळे, महापूर हा मुख्यमंत्र्यांचा ‘पायगुण’ आणि आपत्तीत देखील आमच्याकडे सत्ता द्या:
चिपळूणमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीवरून भाजप नेते तथा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ‘राज्यात पूरस्थिती आली आहे. त्यानंतर चार दिवसांनी मुख्यमंत्री चिपळूणमध्ये आले. हे कसले मुख्यमंत्री आहेत? मी तर म्हणतो राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही. राज्य चालवता येत नसेल तर केंद्राला देऊन टाका. आम्ही वेटिंगवरच आहोत,’ असा हल्ला राणेंनी चढवला.

नारायण राणे यांनी आपल्या दौऱ्या दरम्यान अधिकारी उपस्थित नसल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. मात्र, असं करत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचाही अनादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोलत असताना त्यांनी एकेरी भाषेचा उपयोग करत तो सीएम बीएम गेला उडत असं उद्दाम भाष्य केलं. त्यामुळे यावरुन राणेंवर टीकाही होत आहे.

काय मुख्यमंत्री? कसली संवेदना?
मुख्यमंत्री चौथ्या दिवशी कोकणात का आले ते सांगतो. काल साडे सहाला माझा फॅक्स आला. मी कोकणात येत असल्याचं कळवलं होतं. त्यानंतर त्यांनी पूरपरिस्थिती पाहण्याचा कार्यक्रम तयार केला. तेव्हा मातोश्रीचा दरवाजा उघडला. नाही तर बंद होता. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असतात तसे ते अॅडमिट होते. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज झाला. तर ते डायरेक्ट चिपळूणमध्ये आले. काय मुख्यमंत्री? कसली संवेदना? ही परिस्थिती झाल्या झाल्या त्यांनी यायला हवं होतं. उभं राहून सर्व यंत्रणा कामाला लावायला हवी होती, असं ते म्हणाले. पाठांतर करून यायाचं आणि बोलायचं. कसला मुख्यमंत्री. या राज्यात मुख्यमंत्री नाही. प्रशासन नाही. अशी भयावह परिस्थिती आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Union minister Narayan Rane scolded on collector of Ratnagiri comment on CM Uddhav Thackeray news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x