2 July 2020 8:06 PM
अँप डाउनलोड

कोकणातील पहिले बिझनेस इंक्युबेशन सेंटर; स्टार्टअप संकल्पनाना मिळणार अर्थपुरवठा

Startup Incubation center, Konkan, MLA Nitesh Rane

कणकवली: महाराष्ट्रात पाहिलं बिझनेस इंक्युबेशन सेंटर झालं, मात्र आता दुसरं कोकणात होणार आहे. स्वतः आमदार नितेश राणे यांनी संकल्पना आणली असून ती जून महिन्यात कार्यान्वित होणार आहे. कोकणातील तरुण-तरुणींच्या स्टार्टअप संकल्पनांना सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा येथून दिल्या जाणार असून त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टार्टअप संकल्पनेला भविष्य असल्यास त्याला थेट अर्थसहाय्य देखील मिळणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कोकणातील पहिले बिझनेस इंक्युबेशन सेंटर कणकवलीत एसएसपीएम इंजिनिअरींग कॉलेजमध्ये सुरू केले जाणार आहे. १ जून पासून या सेंटरची सुरूवात केली जाणार असून कोकणातील उद्योग-व्यवसायात करिअर घडवू पाहणाऱ्यां, वेगवेगळ्या संकल्पना राबवू पाहणाऱ्या कोकणातील बुद्धीचातुर्य आणि कौशल्यावर विविध प्रयोग आणि उत्पादने घेवू शकणाऱ्यांना सर्व प्रकारच्या उद्योजकांना या इंक्युबेशन सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

सरकारच्या वतीने दोन कोटी रूपयापर्यंतची आर्थिक मदत त्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तीस कंपन्या या सेंटरशी संलग्न करून दिड हजार लोकांना एकाचवेळी कार्यान्वीत करण्याची क्षमता या सेंटरची राहणार आहे. कोकणातील माणूस उद्योग क्षेत्राकडे वळावा अन्य शहरांमध्ये न जाता आपल्याच जिल्ह्यात-गावात त्यांनी आपले औद्योगिक विश्व उभे करावे. दुसऱ्याकडे नोकरी न करता स्वत:च उद्योजक म्हणून बेरोजगारांना रोजगार द्यावा आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व सेवा-सुविधा, मार्गदर्शन आणि तयार होणारी उत्पादने कंपन्यांपर्यंत नेण्याचे व त्या कंपन्या उद्योजकांशी संलग्न करण्याचे समन्वयक म्हणून हे इंक्युबेशन सेंटर काम करेल अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.

कोकणात कणकवली येथे सुरू होणाºया पहिल्या बिझनेस इंक्युबेशनची माहिती आ. नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी या सेंटरचे सीईओ राजेंद्र गांगण, सामाजिक कार्यकर्ते चारूदत्त सोमण, एसएसपीएमचे रजिस्टार सागर साईकर, प्रिन्सिपल रावसाहेब ठोंबरे आदी उपस्थित होते.

 

News English Summery: The first business incubation center in Konkan will be set up at SSPM Engineering College in Kankavali. The center will be launched from 1st June and all incubators will be given access to this incubation center for those who want to make a career in the Konkan industry, who can apply different concepts and take different experiments and products. Financial assistance of up to Rs 2 crore will be made available on behalf of the government. The center will have the capacity to operate 1,500 people at a time by connecting 30 companies to the center. The people of Konkan should move to the industrial area and build their industrial world in their own district-village without going to other cities. On the other hand, MLA Nitesh Rane said that the incubation center will work as a co-ordinator to employ the unemployed as entrepreneurs without hiring another and to take all the services, guidance and products that are required for them and to attach them to the entrepreneurs.

 

Web News Title: Story first incubation center in Konkan for New Startup ideas.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(47)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x