28 April 2024 6:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

कोकणात ५ एम्ब्युलन्स, २५० डॉक्टरांची टीम पाठवणार | पवारांची माहिती

Sharad Pawar

मुंबई, २७ जुलै | महाराष्ट्रात पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. कोल्हापूर, कोकण, सातारा, सांगली या भागात पूर आल्याने लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. लवकरच मदत जाहीर करण्याचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलवली आहे. यावेळी अनेक जिल्ह्यांचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसे, संकटाचा सामना करण्याचा सरकारला अनुभव असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडून जीवनावश्यक बाबींची मदत करणार, असंही पवार म्हणाले आहेत.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे:
* राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने पुरग्रस्तांना मदत केली
* राज्य सरकार लवकरच धोरण जाहीर करेल
* अहवाल आल्यानंतर मदतीचं धोरण जाहीर करेल
* कोकणात ५ एम्ब्युलन्स, २५० डॉक्टरांची टीम पाठवणार
* जीवनावश्यक बाबी पाठवणार, गॅस, भांडी, सतरंजी पूरग्रस्त भागात राष्ट्रवादी पाठवणार
* २-३ दिवसांत पूरग्रस्त भागात मदत पोहोचेल
* राज्याला पूराचा मोठा फटकापुरामुळे राज्याचं मोठं नुकसान
* राज्यात ६ ते७ जिल्ह्यात पूरामुळे बिकट स्थिती
* राज्य सरकारही मदत करेल
* घरं, शेतीचं मोठं नुकसान झालं
* १६ हजार कुटुंबांचं मोठं नुकसान
* मदत करण्याची आवश्यकता
* अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबाना, जिल्ह्यांना मदतीची गरज
* राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी मदत पाठवली
* स्थानिक स्तरावरही कार्यकर्त्यांनी मदत केली
* १६ हजार कुटुंबांना राष्ट्रवादीकडून मदत
* जीवनावश्यक वस्तूंच वाटप

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP Party will help Konkan flood affected peoples said party president Sharad Pawar news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x