8 May 2024 7:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

नारायण राणेंच्या सामना समोरच्या सभेवेळी संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते - आ. नितेश राणे

Nilesh Rane

मुंबई, ०२ ऑगस्ट | भारतीय जनता पक्ष आणि प्रसाद लाड यांची सेनाभवन फोडण्याची भाषा आणि संजय राऊत यांच्या सामनातील अग्रलेखात भाजपमधील नेत्यांवर केलेली टीका, यावरुन राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण आता रंगताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षात उपऱ्यांना, बाटग्यांना स्थान नव्हतं. परंतु, आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी घणाघाती टीका आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केलीय. त्यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना थेट इशारा दिलाय. तसंच राऊतांवर जोरदार हल्लाही चढवला आहे.

संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते:
नितेश राणेंनी संजय राऊतांवर जहरी टाके केली आहे. नारायण राणे यांनी सेना सोडली तेव्हा सामना समोरच्या सभेत संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते. समोर आले तर ततपप होतं होतं आणि आता धमक्यांची भाषा वापरली जातेय. आम्ही खांद्यावर बंदूक ठेवत नाही. सेनाभवन आणि बाळासाहेबांबद्दल आदर आहे, अशा शब्दात नितेश राणे यांनी राऊतांवर हल्ला चढवला आहे.

संजय राऊत हे शरद पवार यांचं काम करतात:
लोकप्रभामध्ये असताना संजय राऊतांनी बाळासाहेबांसाठी काय भाषा वापरली होती ते पाहावं. नाहीतर मी पत्रकार परिषद घेऊन सांगतो की त्यांनी काय म्हटलं होतं. संजय राऊतांनी जेवढ्यास तेवढं राहावं नाहीतर कुंडली काढू, असा इशाराही नितेश राणेंनी दिलाय. शिवसेनेबद्दल आकस नाही. समोरुन टीका टिप्पणी होत असेल तर गप्प बसणार नाही. संजय राऊत हे शरद पवार यांचं काम करतात. त्यांना शिवसेनेशी काही देणंघेणं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MLA Nitesh Rane criticized Shivsena MP Sanjay Raut after his Saamana Editorial news updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x