मुंबई , ०७ ऑगस्ट | असं म्हणतात की प्रत्येक मुलाला घडवण्यात त्याच्या आईचा वाट असतो आणि ते सुद्धा तितकेच खरे आहे कारण आई हे देवाचे दुसरे रूप आहे. प्रसंगी कधी ओरडते तर कधी लाड सुद्धा करते. इतिहासात अशा अनेक माता होऊन गेल्या ज्यांच्यांमुळे देशाला अनेक कोहिनूर हिरे मिळाले. त्यापैकी एक माता म्हणजे राजमाता जिजाऊ.

जिजाऊ ह्यांना जिजाबाई असे देखील म्हणतात. त्यांचा जन्म १२ जानेवारी, इ .स १५९८ रोजी सिंदखेडराजा, बुलढाणा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव होते आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते. डेसिमर इ.स १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण ६ अपत्ये होती. त्यापैकी ४ दगावली व २ मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजीराजांकडे वाढला आणि शिवाजी राजांची जबाबदारी जिजाबाईंवर आली.

शिवाजी महारांजाच्या संगोपनात त्यांनी जरा देखील कमतरता भासू दिली नाही. त्या शिवाजी महाराजांना भीम, अर्जुन, राम यांच्या गोष्टी सांगून पराक्रमी बनवायचे संस्कार देत होत्या. निर्भिड, पराक्रमी, शूर,धैर्यवान बनवायचे अनके संस्कार त्यांनी शिवाजी महाराजांना दिले. समान न्याय आणि अन्यायाविरुद्ध कठोरात कठोर शिक्षा देण्याचे बीजारोपण त्यांनी केले. शहाजीराजांची सुटका, अफजलखानाचे वध, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगात त्यांना जिजाबाईंचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आपल्या जहागिरीत बसून स्वतः तंटे सोडवत आणि न्याय करत असे. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकानंतर १२ दिवसांनी १७ जून इ.स १६७४ ला त्यांनी शेवटचा श्वास घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी अनेक गुण दिले आणि त्यामुळेच आपल्याला असे थोर छत्रपती शिवाजी महाराज भेटले.

शहाजी राजांची कैद व सुटका, अफजल स्वारी, शिवरायांची आग्रा कैद आणि सुटका, अशा स्वराज्यावर आलेल्या एकाहून एक प्रचंड संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा त्यांनी शिवरायांना दिली. मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या. या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या. रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी १७ जून १६७४ रोजी त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे. अशा या थोर मातेस जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

मुजरा माझा त्या माँ जिजाऊला

घडविले तिने त्या शूर शिवबाला!!

साक्षात होती ती आई भवानी

जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी!!

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Story Title: Rajmata Jijabai information in Marathi news updates.

छत्रपती शिवाजी महाराज घडवणाऱ्या ‘राजमाता जिजाऊ’