21 May 2024 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा, अशी संधी सोडू नका Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा
x

मुंबई महानगरपालिकेच्या 132 अधिकाऱ्यांच्या बढतीचा प्रस्ताव शिवसेनेने का अडवला? - आशिष शेलारांचा प्रश्न

Shivsena

मुंबई, १३ ऑगस्ट | भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलारांनी शिवसेनेला सुनावलं आहे. मुंबई महापालिकेतील एससी, एसटीच्या 132 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला घेरलं आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या का रखडवल्या आहेत? मंत्रालयातली बदल्यांप्रमाणे महापालिकेतही वसुली केली जात आ हे का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

मंजुरीसाठी विलंब का करण्यात येतोय?
आशिष शेलारांनी ट्विट करत शिवसेनेला जाब विचारला आहे. “मुंबई महापालिकेतील अनुसूचित जाती, जमातीसह आरक्षणांच्या रिक्त पदांवर महापालिकेत सेवेत असलेल्या 132 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीत मंजूर झाला. पण 4 सर्वसाधारण सभा घेऊनही सत्ताधारी शिवसेनेकडून या प्रस्तावाला मंजुरीसाठी विलंब का करण्यात येतोय?, असा सवाल शेलार यांनी केला आहे.

चिटणीस पदावर शुभांगी “सावंत” यांना डावलून संगिता “शर्मा” यांना बढती देण्यात आली आहे. आता 132 मराठी अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना पुन्हा अडवणूक करण्यात आली आहे. मंत्रालयातील बदल्यांप्रमाणे पालिकेत पण वसुली? मुंबईकर हो, हे पहा… अवतार मराठी माणसाच्या कैवाऱ्यांचे(?), मराठी अधिकाऱ्यांकडून वसुली करणाऱ्यांचे!”, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MLA Ashish Shelar question to Shivsena over BMC news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x