4 May 2024 9:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

भाजप-महाविकास आघाडीच्या राजकारणामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही | आता आरपारची लढाई

Maratha reservation

जळगाव, १४ ऑगस्ट | राज्यातील मागील भाजपा व विद्यमान महविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार व केंद्र सरकार एकमेकांकडे बोट दाखवत आहे. दोघांच्या राजकारणामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. यापुढे आरपार की लढाई असेल. मराठा समाज मूक मोर्चा काढणार नाही तर, हातात दंडूके घेवून ठोक मोर्चा काढेल, असा इशारा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे. अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने राज्याचा दौरा केला जात आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने ते काल (शुक्रवारी) जळगावात आलेले होते. नूतन मराठा महाविद्यालयात बैठकीपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आता आरपार की लढाई लढावी लागणार:
जावळे पाटील पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडले. राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखविते, केंद्र सरकार राज्याकडे बोट दाखविते आणि दोन्ही सरकार न्यायालयावर बोट ठेवतात. राज्य व केंद्र सरकारने एकत्र बसून मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, यासाठी मार्ग काढला पाहिजे. मात्र, दुर्दैवाने तसे होत नाही. आजवर मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने लढा सुरू ठेवला आहे. तरीही आमच्या पदरात आरक्षण मिळत नसेल तर आरपार की लढाई लढावी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठा समाजाकडून सध्या राज्याचा दौरा सुरू आहे. हा दौरा झाल्यानंतर २५ ऑगस्ट रोजी पुणे येथे बैठक आहे. त्याठिकाणी आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल. तारीख देखील निश्चित केली जाणार आहे. त्यानुसार मातोश्री किंवा मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत. मोर्चासाठी प्रत्येक जिल्ह्यातून १० हजार मराठा बांधव येतील. ३ ते ४ लाखाचा मोर्चा काढणार आहे. त्यावेळी आम्हाला गोळ्या घातल्या तरी मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही, अशी माहितीही जावळे पाटील यांनी दिली.

जगावं की मरावं अशी मराठा समाजाची अवस्था:
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी आत्महत्या केली, अशा लोकांच्या ४५ कुटुंबीयांना देखील न्याय मिळालेला नाही. तसेच कोपर्डी घटनेतील आरोपीच्या फाशीच्या शिक्षेची देखील अंमलबजावणी झालेली नसल्याबद्दल देखील पाटील यांनी संताप व्यक्त केला. जगावं की मरावं अशी मराठा समाजाची अवस्था झाली आहे. त्यामुळे सरकारने याचा विचार करावा, अथवा मराठा समाज मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, मराठा समाज निवडणूक लढणार नसला तरी ज्या ज्या पक्षांनी आरक्षणाला विरोध केला. त्यांना निवडणुकांमध्ये पाडण्याचे काम आम्ही करणार असल्याचा इशाराही शेवटी नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Nanasaheb Jawale Patil talked on Maratha Reservation issue news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x