1 May 2024 6:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

संधी मिळेल तिथे फोटोशॉप? वाजपेयींच्या अस्थी विसर्जनावेळी तो 'अदृश्य हात' कोणाचा?

नवी दिल्ली : काल भारतीय जनता पार्टीचे दिल्लीचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचं यमुना नदीत विसर्जन केलं. त्यानंतर त्यांनी या अस्थिविसर्जनाचे फोटो ट्विट करत शेअर केले खरे, परंतु आता त्यावरून नेटीझन्सने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. कारण शेअर केलेल्या फोटोमध्ये मोडतोड केल्याचे समोर येत आहे. परंतु ते करण्यामागचा मूळ उद्देश तरी काय होता ते समजण्या पलीकडचं आहे.

मनोज तिवारी यांनी शेअर केलेल्या या अस्थिविसर्जनाच्या फोटोमध्ये तिवारी यांच्यासह भाजपाचे नेते बोटीवर स्पष्ट दिसत आहेत. परंतु तिवारी यांनी शेअर केलेल्या एका फोटोत बोटीतून बाहेर आलेला ‘तो’ हात नेमका कोणाचा यावरून समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे. इतकेच नाही तर अस्थिविसर्जन केल्यावर या बोटीतून बाहेर आलेल्या हातानं पाण्याला स्पर्श केल्याचंही फोटोत दिसत आहे.

परंतु जोश मध्ये शेअर केलेल्या या ४-५ फोटोमुळे ते जाणीव पूर्वक करण्यात आलं होत का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एका फोटोत तिवारी अस्थी कलश रिकामा करताना दिसत आहेत. या फोटोत ‘तो’ हात कुठेही दिसत नाहीत. मात्र अस्थी कलश रिकामी केल्यानंतरच्या फोटोत ‘तो’ हात अगदी स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आधी न दिसणारा ‘तो’ हात नंतर अचानक कुठून आला, याची चर्चा सध्या समाज माध्यमांवर रंगली आहे.

जर पहिल्या फोटोचे निरीक्षण केले तर असं दिसेल की वास्तविक त्या बोटीवर कोणताही होल नाही. परंतु दुसऱ्या फोटोमध्ये त्याच बोटीतून एका होल’मधून हात बाहेर येऊन पाण्याला स्पर्श करताना दिसत आहे. त्यामुळे मनोज तिवारी यांनी शेअर केलेला दुसरा फोटो हा मोडतोड केल्याची खात्री पटत आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x