3 May 2024 8:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Sciatica Symptoms | 'सायटिका' हा गंभीर आजार काय आहे? याची लक्षणे व उपचार - नक्की वाचा

Sciatica symptoms and causes

मुंबई, २० ऑगस्ट | सायटिका ही आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाची नाडी असते. ही पाठीच्या मणक्यापासून सुरु होते आणि काही दोन्ही पायापर्यंत गेलेली असते. जर हिच नाडी दुखावली गेली तर हा आजार होऊ शकतो. या आजारात पाठीपासून ते पायापर्यंत अत्यंत वेदना होतात.

‘सायटिका’ हा गंभीर आजार काय आहे? याची लक्षणे व उपचार (Sciatica symptoms and causes in Marathi) :

या आजाराची काही लक्षणे आहेत जसे की कंबरेपासून ते पायापर्यंत अतिशय वेदना होणे, पायातील शक्ती कमी झाल्यासारखे वाटणे, पाय बधीर होणे, पायात मुंग्या येणे, पायात सुया टोचल्याप्रमाणे दुखणे इत्यादी. याची काही कारणे आहेत जसे की या नाडीला दुखापत झाली की त्रास सुरु होतो. तसेच मज्जातंतू किंवा सायटीका चा नाडीतील ट्यूमर्स यामुळे सुद्धा त्रास होतो. स्लिप डिस्क ,स्पॉण्डिलायसिस यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. याचे निदान रुग्णाला होणार त्रास आणि लक्षणे बघून काही शारीरिक तपासणी करून केला जातो. यावर उपचार करण्यासाठी तसेच सूज आणि वेदना कमी करण्यासाठी काही पेनकिलर औषधे दिली जातात तसेच आयुर्वेद पंचकर्मे, फिजिओथेरपिने सुद्धा यावर उपचार केले जातात.

घोटा आणि पावलातली शक्ती कमी होणं: (Sciatica symptoms and causes in Marathi)
अतिशय वाढलेल्या आजारात पायाच्या स्नायूत कमजोरी येऊन चालणं अशक्य होण्याची शक्यता असते. याला फूट ड्रॉप म्हणतात. स्लिप डिस्क या आजारात सुरुवातीला शस्त्रक्रियेशिवाय उपचार केले जातात हे खरं; पण वेदना तशाच सुरू राहिल्यास रुग्णाची अवस्था कठीण होते. रोजच वेदना सहन करत आयुष्य कंठण्याची वेळ त्याच्यावर येते. त्यातच समाजात या आजाराबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे शस्त्रक्रियेला घाबरून दुखणं सहन करण्याकडे अनेकांचा कल असतो. अनेकदा हे दुखणं मोठी शस्त्रक्रिया करण्याएवढं तीव्र नसतं. दैनंदिन जीवनात मात्र कायमचा त्रास उत्पन्न करणारं ठरतं. अशा रुग्णांसाठी कमी टाक्यांची मणक्याची शस्त्रक्रिया अत्यंत उपयुक्त ठरते.

सायटिकाचे निदान असे केले जाते:
रुग्णाला होणारा त्रास, असलेली लक्षणे आणि शारीरिक तपासणी याद्वारे आपले डॉक्टर सायटिकाचे निदान करतील. तसेच निदान अधिक स्पष्ट होण्यासाठी MRI स्कॅन, CT स्कॅन किंवा एक्स-रे यासारख्या काही तपासण्या कराव्या लागतील.

सायटिकावर हे आहेत उपचार  (Sciatica treatments) :

सूज व वेदना कमी करण्यासाठी एस्पिरिन आणि इबुप्रोफेन सारखी पेनकिलर औषधे दिली जातील. याशिवाय आयुर्वेदिक पंचकर्म, फिजिओथेरपी, मसाज थेरपी यांचाही उपयोग या त्रासावर चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

सायटिकावर दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया (operation) उपलब्ध आहेत. एक म्हणजे डिस्टेक्टॉमी, यामध्ये सायटिक नाडीवर दबाव टाकणाऱ्या डिस्कचा भाग काढून टाकला जातो. आणि दुसरी शस्त्रक्रिया म्हणजे मायक्रोडिसेक्टॉमी, ज्यामध्ये आपले डॉक्टर मायक्रोस्कोप वापरत असताना नाडीवर दाब पडणाऱ्या डिस्कचा भाग काढून टाकतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Title: Sciatica symptoms and causes in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x