5 May 2024 11:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

VIDEO | नारायण राणे जेवत होते, पण पोलिसांनी ना जेवणाचं ताट खेचलं, ना धक्काबुक्की | प्रसाद लाड यांचा माध्यमांकडे बनाव?

Narayan Rane

रत्नागिरी, २४ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काही वेळापूर्वीच पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र आता नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Ratnagiri police arrested Union minister Narayan Rane after controversial statement on CM Uddhav Thackeray :

नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी नितेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता. पोलीस नारायण राणेंना घेऊन रवाना झाले आहेत.

त्यानंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या जीवाला धोका असल्याचं वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी माध्यमांना एक व्हिडिओ दाखवताना पोलिसांनी नारायण राणे जेवत असताना त्यांच्या हातातील ताट ओढून घेतलं आणि नारायण राणेंना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. मात्र व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास त्यात तथ्य नाही असंच म्हणावं लागेल.

प्रसाद लाड यांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये काय दिसतंय:
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे हातात ताट घेऊन जेवताना दिसत आहेत. समोर पोलीसांची टीम असून नारायण राणे आणि पोलिसांच्या टीमच्या मध्ये निलेश राणे, नितेश राणे आणि काही पदाधिकारी पोलिसांशी वाद घालताना दिसत आहेत. तर नारायण राणे हातातील ताट हातातच ठेऊन उभे राहून पोलिसांची वाद घालत असल्याचं दिसतंय. मात्र संबंधित व्हिडिओमध्ये कुठे नारायण राणे यांना धक्काबुक्की किंवा हातातील जेवणाचं ताट पोलिसांनी हुसकावून घेतल्याचं पाहायला मिळत नाही. त्यामुळे व्हिडिओतील सोयीस्कर रेकॉर्डिंग प्रसार माध्यमांकडे चुकीच्या पद्धतीने भाजपचे आमदार प्रसाद लाड मांडत असल्याचं व्हिडिओ पाहिल्यावर स्पष्ट दिसतंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Ratnagiri police arrested Union minister Narayan Rane after controversial statement on CM Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x