6 May 2024 1:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

ज्या माणसाला 'मी राजा आहे' हे दाखवावे लागते तो खरा राजा नसतोच | अमृता फडणवीसांच्या ट्विटवर ट्रोलिंग सुरु

Amruta Fadnavis

मुंबई, २५ ऑगस्ट | राज्यात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध केंद्रीय मंत्री नारायण राणे असा वाद सुरू आहे. याच वादात आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली. त्यांनी एक ट्विट करून खरा राजा कसा असतो याचा अर्थ सांगितला. ज्या माणसाला मी राजा आहे असे दाखवावे लागते तो खरा राजा नसतोच असे अमृता फडणवीस यांनी लिहिले आहे. अर्थातच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.

ज्या माणसाला ‘मी राजा आहे’ हे दाखवावे लागते तो खरा राजा नसतोच, अमृता फडणवीसांच्या ट्विटवर ट्रोलिंग सुरु – Any man who must show I am the King is no true King said Amruta Fadnavis :

अमृता फडणवीस यांच्या ट्विटनंतर लगेच त्यांना ट्रोल करणाऱ्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली. त्यांनी हा टोला घरचा आहेर म्हणून फडणवीसांनाच लगावला असेल असे एकाने म्हटले. तर काहींनी त्यांच्या गायणावरून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अमृता फडणवीस यांनी ट्विट इंग्रजीत केले. त्यावरूनही लोकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

भाजपकडून राणेंची पाठराखण:
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या विधानाचे भारतीय जनता पक्षाकडून समर्थन करण्यात आले आहे. अर्थातच कानाखाली लगावणे किंवा थोबाडीत मारणे हा सामान्य संवाद आहे असे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. पाटील बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की ‘राणेंचे वाक्य चुकलेले नाही, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद आहे. उद्धव ठाकरे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत हा संदर्भ देताना चुकले. यावर राणे साहेब मी शेजारी असतो तर थोबाडीत मारली असती असे म्हणाले होते. मात्र हा कॉमन संवाद आहे. ते थोबाडीत मारायला मातोश्रीवर जाणार, शोधून थोबाडीत मारणार आहे असे ते म्हणाले होते का?’ असे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावर नारायण राणे यांना मंगळवारी नाशिक पोलिसांनी अटक केली नंतर जामिनावर सुटका त्यांचीही सुटकाही करण्यात आली. मात्र तरी देखील राणेंच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. आता नाशिक पोलिसांनी आपल्याकडे दाखल एका केसमध्ये नारायण राणेंना नोटीस पाठवून त्यांना 2 सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Any man who must show I am the King is no true King said Amruta Fadnavis.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x