मुंबई, २५ ऑगस्ट | नारायण राणे यांच्यावर राज्य सरकारकडून करण्यात आलेली अटकेची कारवाई आणि त्यानंतर मिळालेला जामीन यामुळे भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलंच आक्रमक झाले आहेत. आता भाजपनेही शिवसेनेला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे. भाजप आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे.

३ वर्षा पूर्वीची घटना:
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरुन, भाजप आता उद्धव ठाकरेंविरुद्ध तक्रार दाखल करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 5 पोलीस ठाण्यात भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रारी केल्या जाणार आहेत. त्याबाबतची माहिती भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली. पण कायदेतज्ञांच्या मते उद्धव ठाकरे विरोधात आता तक्रार दाखल होऊ शकत नाही. तक्रार दाखल करुन घेताना कायदेशीर अडचणी येऊ शकतात. कायद्यानुसार एखादी घटना घडली तर लगेच तक्रार दाखल करणं गरजेचं आहे.

Huge Embarrassment when PM Modi walked as National Anthem being played in Russia :

तर पंतप्रधानकडून राष्ट्रगीत सुरु असताना केली होती ही चूक:
नारायण राणे यांनी आज देशभक्ती विषयवार भाष्य केलं आणि कारण ठरलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनी बाजूला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना खात्री करण्यासाठी विचारलेला प्रश्न. त्यावरून देशभक्तीला हात घातला गेला. आणि देशभक्ती म्हटल्यावर देशाचा तिरंगा आणि देशाचं राष्ट्रगीताचा मान हा सर्वोच्य असतो. तसेच याच तिरंगा आणि देशाचं राष्ट्रगीताचा अपमान हा सर्वात मोठा गुन्हा समाजला जातो. तसाच प्रकार घडला होता २०१५ मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर होते. विमानतळावर मोदींना सलामी देण्यासाठी विमातळावर रशियनसैन्य उपस्थित होते. त्यावेळी भारताचं राष्ट्रगीत सुरु असताना स्थिर उभं राहणं हा नियम आहे. मात्र भारताचे राष्ट्रगीत सुरु असताना रशियन सैन्य आणि रशियन अधिकारी स्थिर उभे होते. पण, पंतप्रधान मोदी थेट चालू लागले. भारताचं राष्ट्रगीत सुरु आणि त्यामुळे पंतप्रधानांनी एकाजागी उभं राहणं अपेक्षित असताना मोदी पुढे चालू लागले आणि त्यानंतर रशियन अधिकाऱ्यांना ते समजलं आणि त्यांनी अक्षरशः मोदींना पुन्हा मागे आणून राष्ट्रगीत सुरु असल्याने उभं राहण्यास सांगितल्याचे जगाने पहिले. आज त्याच गोष्टी विरोधकांनी पुन्हा उगळ्यास मोदी-शहांच्या बाबतीतही अशा अनेक गोष्टी पुढे येतील अशी शक्यता आहे.

काय घडलं होतं रशियात भारताचं राष्ट्रगीत सुरु असताना त्याचा हा व्हिडिओ; (VIDEO Courtesy ABP News)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Huge Embarrassment when PM Modi walked as National Anthem being played in Russia.

VIDEO | राणेंचा राष्ट्रभक्तीला हात | तर राष्ट्रगीताबाबतीत मोदींकडूनही घडली होती चूक | मग विरोधकही…