6 May 2024 4:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Ramayana | या श्रापामुळे रावणाचा वध प्रभू श्रीराम यांच्या हातून झाला - नक्की वाचा

 Why did Ram kill Ravana

मुंबई, २८ ऑगस्ट | आजपासून हजारो वर्षांपूर्वी इतिहासात घडलेल्या घटनांचे व्यवस्तीत रित्या संग्रह केलेला आपल्याला आजही आढळून येतो. वाल्मिकी रामायणाचे त्या काळातील संतांनी आप आपल्या भाषेत अनुवादन केलेले आढळते. रामायणात भगवान श्रीराम यांच्या जन्मापासून तर निर्गमनापर्यंत सर्व माहिती दिली गेली आहे. आपल्याला रामायणात पाहायला मिळते की सूर्यवंशी कुळातील राजा दशरथ यांना तीन पत्नींपासून चार पुत्ररत्न प्राप्त होतात. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आणि समोरील रामायण आपल्याला माहितीच आहे.

या श्रापामुळे रावणाचा वध प्रभू श्रीराम यांच्या हातून झाला – Why did Ram kill Ravana in Marathi :

पण आजच्या लेखात आपण रामायणातील काही विशेष घटनांवर लक्ष केंद्रित करणार आहोत जसे दशानन रावणाचा वध हा प्रभू श्रीराम यांच्या हातूनच का झाला? यामागे काही तरी कारण असेल का ? तर चला आजच्या लेखात आपण त्यामागचं कारण पाहूया की रावणाची मृत्यु ही प्रभू श्रीराम यांच्या हातूनच का झाली ?

प्रभू श्रीरामांच्या हातून रावणाचा वध का झाला –
ही गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा प्रभू श्रीराम यांचा जन्मही झालेला नव्हता, आणि रावणाने पूर्ण धर्तीवर आपले साम्राज्य पसरविण्यासाठी अनेक राजांवर आक्रमण करत बरेचसे राज्य काबीज केले होते, रावणाला त्याच्या शक्तींचा गर्व झालेला होता, युद्ध करत करत तो सूर्यवंशी कुळात आला त्याकाळचे सूर्यवंशी राजा अनरण्य होते.

त्यांनी रावणाशी युध्द केले आणि रावणाशी ते त्या युध्दामध्ये पराजित झाले आणि ते स्वतःच्या प्राणाला मुकले परंतु मरणाच्या आधी त्यांनी रावणाला श्राप दिला, की आज माझा वध तुझ्या हातून झाला परंतु भविष्यात तुझ्याही वध माझ्याच कुळातील व्यक्ती करेल. असा श्राप त्यांनी रावणाला देऊन ते मरण पावले.

Truth of Ramayana :

त्यांनंतर रघुवंशात विष्णूचा अवतार मानले जाणारे प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला, त्यांनी गुरुकुलात शिक्षा प्राप्त केली, आपल्या तरुणवयातच अनेक राक्षसांचा वध केला, सितास्वयंवरा मध्ये आपले चातुर्य आणि बल दाखवून त्यांनी शिवधनुष्य मोडला, माता सीतेशी विवाह केला, आणि त्यानंतर अयोध्येला आले काही दिवसांनंतर माता कैकयीच्या दासी मंथरेने कैकयी मातेच्या मनात पुत्रमोहाचे विष घातले आणि प्रभू श्रीरामांना १४ वर्ष वनवास आणि भरताला सिंहासन मागत राजा दशरथ यांच्याकडे आपले राहिलेले दोन वर मागितले, त्यांनंतर प्रभू श्रीरामांनी पित्याच्या शब्दांचे पालन करत वनवास स्विकारला आणि १४ वर्षांसाठी वनवासात निघून गेले. त्यांनंतर नियतीचे चक्र फिरत गेले आणि रावणाला कुबुद्धि सुचली आणि माता सीतेचे त्याने अपहरण करून लंकेला घेऊन गेला.

त्यानंतर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण दोघांनी मिळून सीता मातेला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण तेव्हा त्यांना ते शक्य झाले नाही, मग प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना वानर सेनेचा पाठिंबा मिळाला आणि सीता मातेचा शोध सुरू झाला, आणि तो शोध पूर्णत्वास आणला पवनपुत्र हनुमान यांनी मग नल, निल जमुवंत अंगत यांच्या मदतीने लंकेला जाण्यासाठी पुलाची निर्मिती करण्यात आली आणि त्यानंतर युध्दाला सुरुवात झाली बरेच पराक्रमी योध्दा त्या युध्दामध्ये मारल्या गेले, आणि शेवटी वेळ आली होती ती स्वतः लंकापती रावण आणि प्रभू श्रीराम यांच्यात युद्ध करण्याची आणि हे युध्द करतांना रावणाचा सुध्दा बाकी राक्षसांप्रमाणेकच वध झाला. तर रघुवंशाच्या त्या राजाच्या श्रापामुळे दशानन रावणाचा अश्या प्रकारे प्रभू श्रीराम याच्या हातून वध झाला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Why did Ram kill Ravana in Marathi.

हॅशटॅग्स

#Religion(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x