28 April 2024 2:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट - जावेद अख्तर

Javed Akhtar

मुंबई, ०४ सप्टेंबर | प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली असून, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संभाषण करताना अख्तर म्हणाले की, आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट आहे. ते म्हणाले की, भारतीय संविधान त्याच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते या सीमा देखील ओलांडतील.

आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट – Javed Akhtar compared RSS with Taliban :

उजवी विचारसरणीचे उदाहरण देताना अख्तर म्हणाले, की जगभरातील मुस्लिम राईट विंग, ख्रिश्चन राईट विंग आणि हिंदू राईट विंग यांच्या विचारसरणीमध्ये समानता आहे. तालिबान आणि कट्टरवारी हिंदू यांची ध्येय एकच आहे. ते इस्लामिक देश निर्माण करत आहे. तर हे हिंदू देश निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त अद्याप हे तालिबान एवढे ताकदवान झाले नाहीत.

राईट विंगकडे वस्तुनिष्ठपणे पाहिले तर त्यांची वेगवेगळी नावे असू शकतात. परंतु ती सर्व समान आहेत. त्यांचे तालिबान सारखेच अल्पसंख्यांकांवर प्रेम नाही. त्यांना महिलांनी घरीच राहावे, असे वाटते. दोघांमध्ये काहीच फरक नाही. दोघेही म्हणतात की कोणताही कायदा त्यांच्या धार्मिक श्रद्धेपेक्षा मोठा नाही, असे जावेद अख्तर म्हणाले.

तालिबानची मध्ययुगीन मानसिकता:
आरएसएस, विहिंप, बजरंग दल सारख्या संघटनांना समर्थन देणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अर्थातच तालिबानची मध्ययुगीन मानसिकता आहे, यात शंका नाही, ते रानटी आहेत, असे जावेद अख्तर म्हणाले. तसेच मुस्लिम व्यक्तींनी तालिबानला पाठिंबा दिला आहे. यावर जावेद यांनी प्रतिक्रिया दिली. तालिबानला पाठिंबा देणारे मुस्लिम मोजकेच आहेत. मोजक्या मुस्लिमांच्या अशा वक्तव्यांमुळे बहुतांश भारतीय मुस्लिम हैराण असल्याचं त्यांनी म्हटलं.

भारत धर्मनिरपेक्ष देश:
हा देश मुळात धर्मनिरपेक्ष देश आहे. येथील बहुसंख्य लोकसंख्या धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे तालिबानची संकल्पना कोणत्याही भारतीयांना आकर्षित करू शकत नाही. या देशातील बहुतेक लोक सुसंस्कृत आणि सहिष्णु आहेत. त्याचा आदर केला पाहिजे. भारत कधीही तालिबानी देश होऊ शकत नाही, असा विश्वास जावेद अख्तर यांनी व्यक्त केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Javed Akhtar compared RSS with Taliban.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x