4 May 2024 2:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाची शिवसेनेकडून गंभीर दखल, सामाना'तून संकेत

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाची गंभीर दखल घेतल्याचे संकेत सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून दिले आहेत. त्यासाठी पक्षाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पक्षाच्या विश्वासातील सर्व पदाधिकाऱ्यांना भाजपच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्याचे वृत्त आहे.

सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर सध्या भाजप आगामी निवडणुकीआधी फोडाफोडीचं राजकारण करू शकते याची चुणूक पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना लागली असून त्यांनी योग्यती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासंबंधित रणनीती आखून भाजपला अडचणीत आणण्याच्या हालचाली शिवसेनेत सुरु झाल्याचे वृत्त आहे.

सध्या सर्वच पक्ष आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले असून त्यात भाजपसुद्धा आघाडीवर आहे. पक्षाच्या आमदारांची संख्या वाढविण्यासाठी इतर पक्षांमधील आमदारांशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधणे सुरू केल्याचे शिवसनेच्या कानावर आले आहे. विशेष म्हणजे यात शिवसेनेच्या आमदारांचा समावेश सर्वाधिक आहे असे सांगण्यात येते आहे. त्यासाठी निवडणुकीसाठीचा आवश्यक तो खर्च देण्याचे आमिष समोरच्यांना दाखविण्यात येत आहे असे वृत्त पक्ष प्रमुखांच्या कानावर आले आहे. शिवसेनेच्या काही निष्ठावान आमदारांनी याबाबत पक्षप्रमुखांना स्वतः भेटून माहिती दिल्याचे समजते. पक्षातील ज्या आमदारांची पुन्हा निवडून येताना खूप दमछाक होण्याची शक्यता आहे असे आमदार केवळ गप्प राहून शेवटच्या क्षणी पक्ष सोडल्यास पक्षाची अडचण होईल हे गृहित धरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची ही रणनीती गांभीर्याने घेतल्याचे समजते आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x