3 May 2024 3:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

EPFO सदस्यांचे नॉमिनी बदलण्याची प्रक्रिया जाणून घ्या

EPFO Nominee

मुंबई, ०६ सप्टेंबर | ईपीएफओने पीएफ ग्राहकांना नॉमिनी (EPFO Nominee) बलण्याचा अधिकार दिला आहे. पीएफ सदस्यांना यासाठी नियोक्त्याची एनओसी घेण्याची गरज नाही. हे सदस्य स्वत:त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा तपशील त्यांच्या PF खात्यावर फोटोसह अपलोड करू शकतील. या अधिकारामुळे पीएफ सदस्यांच्या अकाली मृत्यूमुळे नॉमिनी असलेल्या व्यक्तीला चिंता करायची गरज नाही. सदस्यांचे मृत्यू प्रमाणपत्र जोडल्यास अंतिम थकबाकीची प्रक्रिया सुरू होईल.

EPFO सदस्यांचे नॉमिनी बदलण्याची प्रक्रिया जाणून घ्या – How to update the nominee in EPFO :

ईपीएफओने सर्व प्रादेशिक भविष्य निधी कार्यालयाला स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या निमित्ताने सर्व ऑनलाइन करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. 9-10 सप्टेंबर रोजी प्रादेशिक भविष्य निधी कार्यालय पीएफ सदस्यांना जागरूक करण्यासाठी मोहीम देखील राबवणार. ईपीएफओ मुख्यालयाचे प्रादेशिक पीएफ आयुक्त उत्तम प्रकाश ई-नॉमिनेशन शंभर टक्के करण्यासाठी एक पत्रक जारी केले आहे. ज्या तीन कार्यालयामध्ये 100 टक्के लक्ष्य पूर्ण केले जाईल, त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. प्रमानपत्रासह ईपीएफओ सदस्यांना ऑनलाइन प्रक्रियेची लिंकसुद्धा दिली आहे.

ईपीएफओ उत्तरप्रदेशचे सदस्य सुखदेव प्रसाद मिश्रा यांनीस सांगितले की शंभर टक्के पिएफ खात्यांमध्ये नॉमीनीस व्यक्तींचा तपशील भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आतापर्यंत, सदस्य नियोक्ताकडे जात होते आणि कुटुंबातील सदस्य आणि नॉमिनी व्यक्तींची माहिती नोंदवत होते. हे त्यांना अनेक दिवसांपासून घेत आहे. EPFO ने आपले खाते सदस्यांना बदलण्याचा अधिकार दिला आहे. सदस्य नॉमिनीमध्ये बदल करू शकतो. यासाठी सदस्याला नियोक्ता किंवा एचआयाकडे जाण्याची गरज नाही. पण ज्यांचे आधार कार्ड पीएफ खात्याच्या युएएनसह अपलोड केले असेल त्यांना नॉमिनी बदलण्याचा अधिकार दिला आहे.

प्रक्रिया:

* नॉमिनी व्यक्तीला त्याच्या पीएफ खात्याशी जोडण्यासाठी सदस्याला 3.5सेमी -4.5 सेमी फोटो द्यावा लागणार.
* नॉमिनीचे आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, पत्ता, IFSC कोड पहिलेच स्कॅन करून फाइल तयार करावी.

अशा प्रकारे नॉमिनेशन करावे:

* पीएफ सदस्याला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करून सेवा सर्विस पेजवर जावे.
* येथे तुम्हाला मेंबर पेजवर क्लिक करावे लागेल आणि UAN आणि पासवॉर्ड टाकावे लागेल.
* यानंतर, पीएफ सदस्याला पीफ सदस्याला प्रक्रिया सुरू करण्यासाठी ई- नॉमीनेशनच्या मैनेज टॅबवर क्लिक करावे.
* नंतर सेव्हवर क्लिक केल्यावर अॅड फॅमिली डिटेलवर क्लिक करावे.
* यानंतर, तुम्हाला तुमच्या नॉमिनेशन डिटेल ब्लॉकवरील सर्व माहिती भरावी लागेल.
* ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, ई- साईन तयार करण्यासाठी त्यावर क्लिक करावे.
* येथे ई-साईन तयार होताच, सदस्यांच्या मोबाइलवर ओटीपी क्रमांक पाठवण्यात येईल.
* ओटीपी टाकल्यानंतर सबमिट करावे.

टिप: तुम्हाला मिळालेला OTP कोणसोबतसुद्धा शेअर करू नका.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to update the nominee in EPFO.

हॅशटॅग्स

#EPFO(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x