नवी दिल्ली : आज आयपीसी कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यात अंतिम सुनावणीत आज समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय देण्यात आला आहे. परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अनेक दिवसांपासून सुनावणी सुरु होती.

सर्वोच न्यायालयाच्या या निर्णयाने समलैंगिक संबंध हा गुन्हा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितलं की, देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार असून प्रत्येकाला प्रत्येकाची स्वतंत्र ओळख आहे. तसेच समलैंगिकांनाही मुलभूत हक्क मिळण्याचा अधिकार आहे. आधी केलेल्या चुका आता सुधारण्याची गरज असून जुनी विचारधारा बदलण्याची वेळ आता आली असल्याच न्यायालयाने निकालादरम्यान स्पष्ट केलं आहे.

homosexuality is not a crime verdict supreme court today