10 May 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स Bonus Shares | कमाईची मोठी संधी! सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, मल्टिबॅगर स्टॉक खरेदी करा Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉक डाऊनसाईड झोनच्या दिशेने? ब्रेकआऊट तोडल्यास रु.400 पार Patel Engineering Share Price | शेअर प्राईस 55 रुपये! स्वस्त शेअरला तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, स्टॉक तेजीत धावणार IPO GMP | आला रे आला IPO आला! ग्रे मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell?
x

साकिनाका बलात्कार | पीडितेच्या आईने महापौरांना सांगितलेली हकिकत | पीडित महिला व आरोपी 10-12 वर्षापासून एकत्र राहायचे

Sakinaka Rape

मुंबई , ११ सप्टेंबर | मुंबईतील साकिनाका परिसरात एका 30 वर्षाच्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, या घटनेत महिलेची प्रक़ृती चिंताजनक असल्याने तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आज डॉक्टरांनी सदरील पीडित महिलेला मृत घोषित केले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

साकिनाका बलात्कार, पीडितेच्या आईने महापौरांना सांगितलेली हकिकत, पीडित महिला व आरोपी 10-12 वर्षापासून एकत्र राहायचे – Mumbai Mayor Kishori Pednekar was meet mother of Saki Naka rape victim :

विशेष म्हणजे पीडित महिलेचा मृत्यू होण्यापूर्वी महापौरांनी संबंधित रुग्णालयाला भेट देत तीची विचारपूस केली. दरम्यान, महापौरांनी डॉक्टरांकडून उपचाराची माहित घेत रुग्णालयाच्या डीन विद्या ठाकूर यांच्याशी ही संवाद साधला होता. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी पीडित महिलेच्या आईशी संवाद साधत घटनेची माहिती घेतली होती.

पीडितेच्या आईने सांगितली हकिकत:
महापौर किशोरी पेढणेकर यांच्या म्हणण्यानुसार, पीडित महिला त्या पुरुषासोबत मागील 10 ते 12 वर्षापासून राहत होती. दरम्यान, त्या दोघांमध्ये भांडण व्हायचे. तो तीला प्रचंड मारहाण करायचा हे कळल्यावर स्थानिकांनी पोलिसांनी बोलावून घेतले होते. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत महिलेला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले होते अशी माहिती महापौर किशोरी पेढणेकर यांनी दिली आहे.

संपूर्ण प्रकरण काय?
साकिनाका येथील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, तिने शहरातील एका रुग्णालयात उपचारांदरम्यान प्राण सोडले आहेत. ती 9 सप्टेंबरला साकीनाका परीसरातील खैरानी रोडवर बलात्कारानंतर बेशुद्धा अवस्थेत सापडली होती. या घटनेत पीडित महिलेसोबत निर्भयासारखे व्यवहार झाल्याचे समोर आले होते.या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री तीन वाजता घडली होती. आरोपींनी सामूहिक बलात्कारानंतर महिलेच्या खासगी अवयवात रॉड घुसवला होता. यामुळे पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी पीडित महिलेला खैरानी रस्त्यावरून उचलून आणले होते.

महिलेच्या खासगी अवयवात जखम:
डॉक्टरांच्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या अंतर्गत भागात जखम झाली आहे. महिलेचे आॅपरेशन करण्यात आले असून तीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख मोहन चव्हाण अशी झाली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai Mayor Kishori Pednekar was meet mother of Saki Naka rape victim.

हॅशटॅग्स

#MumbaiMayor(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x