13 July 2020 6:45 AM
अँप डाउनलोड

उदयनराजेंना, शिवेंद्रराजेंना आणि छत्रपती संभाजी राजेंना हे मान्य आहे का? - संजय राऊत

Chhatrapati Shivaji Maharaj, PM Narendra Modi

नवी दिल्ली: ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाचं भाजपकडून दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन करण्यात आले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारं हे पुस्तक दिल्ली भाजपच्या पक्ष कार्यालयात प्रकाशित झालं आहे. मात्र, या पुस्तकामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी करणं अनेकांना पटणारं नाही.

मराठा क्रांती मोर्चानेही या पुस्तकाला विरोध दर्शवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. आपण प्रधानमंत्री आहात आपला सन्मान आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना कधीही शक्य नाही या घटनेचा निषेध करतो, असं समन्वयक विनोद पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, भाजपच्या या पुस्तक प्रकाशनामुळे विरोधीपक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.

यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट प्रश्न उपस्थित करत, ‘सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयन राजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांचया वंशजांनो बोला..काहीतरी बोला’ असं ट्विट करत मत व्यक्त करण्यास सांगितलं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(105)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x