26 July 2021 2:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

भारतावर जेवढा आपला अधिकार तेवढाच पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींचाही: अमित शहा

Chief Minister Mamta Banerjee, Rahul Gandhi, CAA, Amit Shah

जबलपूर: जेएनयूमधील आंदोलनाच्या मुद्द्यावरून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज, रविवारी जबलपूरमधील सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात येईल, असा इशारा शहा यांनी दिला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

यावेळी गृहमंत्री शाह यांनी हे देखील सांगितले की, आज काँग्रेस संपूर्ण देशभर सीएएचा विरोध करत आहे. मी राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान करतो की, सीएएमुळे कोणाचेही नागरिकत्व हिरावण्याची तरतूद असल्याचे त्यांनी दाखवून द्यावे. या कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची नाहीतर नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.

काँग्रेस पक्ष, अरविंद केजरीवाल आणि कम्युनिस्ट पक्ष एकत्र येऊन देशाच्या जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप शहांनी केला. नागरिकत्व कायद्यात कोणाचंही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही. उलट या कायद्याच्या आधारे नागरिकत्व दिलं जाणार आहे, असं गृहमंत्री म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद असल्यास राहुल गांधी आणि ममता बॅनर्जींनी ती शोधून दाखवावी, असं थेट आव्हान शहांनी दिलं.

 

Web Title:  Union minister Amit Shah attacks opposition over CAA challenges Rahul Gandhi Chief Minister Mamta Banerjee.

हॅशटॅग्स

#Amit Shah(257)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x