दिवाळीच्या तोंडावर बनावट शपथपत्र प्रकरण निघालं फुसका बार, क्राईम ब्रँचच्या चौकशीत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही

Uddhav Thackeray | केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्या गेलेल्या पुराव्यांमध्ये पक्ष पातळीवर शिंदे गट उद्धव ठाकरेंच्या आसपासही नाही हे समोर आलं होतं. शिवाय लोकसभेचे ६ खासदार, राज्यसभा ३ खासदार, विधानपरिषदेचे सर्व आमदार तसेच १४ आमदारांचा पाठिंबा आहे आणि तसे पुरावे समोर आले आहेत. मात्र विविध पदाधिकारी व शिवसैनिक बंडखोर शिंदे गटात सहभागी होत असल्याने ठाकरे गटाने एक शक्कल लढविली लढवली आणि बनावट आरोपपत्र दिल्याचा आरोप विरोधकांनी उद्धव ठाकरेंच्या सेनेवर केला होता.
आमचा उद्धव ठाकरे यांनाच पाठिंबा असून आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत, अशा आशयाचे शपथपत्र स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्याची मोहीम राबविण्यात आली होती. दरम्यान, मुंबई, नवी मुंबई, ठाणेसह ठिकठिकाणी खोटे (बोगस) तथा बनावट शपथपत्र तयार करण्यात आल्याचे समोर आले होते. सुमारे साडेचार हजार पेक्षा जास्त बनावट शपथपत्र सापडल्याची तक्रार शिंदे गटाकडून करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले होते आणि यासंदर्भात गुन्हे शाखेकडे तपास सोपीविण्यात आला होता. मात्र गुन्हे शाखे तपासात संपूर्ण प्रकरण फुसका बार निघाल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचच्या दोन अधिकाऱ्यांचे पथक तीन दिवस कोपरगावमध्ये ठाण मांडून होते. या सर्व चौकशीत ठाकरे गटाला दिलासा मिळाल्याचे दिसून येतं आहे.
कोपरगावमधील २०० शपथपत्रांवर आक्षेप घेण्यात आला होता. निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्राईम ब्रँचकडे वर्ग झाल्यानंतर दोन अधिकाऱ्यांचे पथक कोपरगावमध्ये दाखल झाले. त्या अनुषंगाने २०० जणांची क्राइम ब्रँचने तीन दिवस चौकशी करून शहानिशा केली असता शपथपत्रांसंदर्भात काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी मधुकर सानप यांनी सांगितलं आहे.
तर ही शपथपत्रे आम्ही स्वत : दिली असुन सरकार आता ED प्रमाणे क्राईम ब्रांचच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे आणि शहरप्रमुख कलविंदर दडीयाल यांनी केलाय. दरम्यान, तीन दिवसांच्या कसून चौकशीनंतर कोपगावमध्ये ठाकरे गटाला दिलासा मिळताना दिसतोय. राज्यभरात अनेक ठिकाणी बनावट शपथपत्र प्रकरणी दाखल गुन्ह्याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे अंतिम अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Huge relief to Thackerays Shivsena from crime branch in fake affidavit case check details 14 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
-
Hemang Resources Share Price | कमाईची संधी! 164 टक्के परतावा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक डिटेल्स पहा
-
Quality Foils India IPO | या आयपीओला मिळाला उदंड प्रतिसाद, स्टॉकची लिस्टिंग जबरदस्त होणार, आयपीओ GMP किती?
-
Sprayking Agro Equipment Share Price | लोकांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली, रेकॉर्ड डेट पहा, फायदा घ्या
-
Suryalata Spinning Mills Share Price | 25 दिवसात 100% परतावा! हा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक खरेदी करणार का?
-
Aditya Vision Share Price | अबब! नशीब बदलणारा शेअर, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 8000 टक्के परतावा दिला, स्टॉक आजही तेजीत
-
Multibagger Stocks | होय! हेच ते 10 मल्टिबॅगर शेअर्स! फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा देऊन श्रीमंत करत आहेत
-
Achyut Healthcare Share Price | गुंतवणुकदारांना मालामाल करणारी कंपनी फ्री शेअर्स वाटप करणार, रेकॉर्ड डेट आधी खरेदी करा
-
Global Capital Markets Share Price | 1 वर्षात 482% परतावा देणाऱ्या शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळत आहेत, संधीचा फायदा घ्या
-
Kama Holdings Share Price | या शेअरवर 840 टक्के डिव्हीडंड मिळणार, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड डेट माहिती आहे का?