5 May 2024 6:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Mumbai Local Blast Terror Plan | राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Dilip Walse Patil

मुंबई, १५ सप्टेंबर | एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा भाग राहिलेल्या पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधीत 6 दहशतवाद्यांना मंगळवारी (14 सप्टेंबर) ला अटक करण्यात आली. याच्या काही तासांनंतरच मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्ह जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालियाच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. समीर कालिया 12 सप्टेंबरपासून घरातून बेपत्ता होता आणि 14 रोजी त्याच्या अटकेची बाब समोर आली आहे. दिल्ली गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, मुंबईहून दिल्लीला जात असताना शेखला कोटा येथून एका ट्रेनमध्ये अटक करण्यात आली आहे.

Mumbai Local Blast Terror Plan, राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक – Maharashtra home minister Dilip Walse Patil call police meeting after six suspects terrorist arrest in Delhi :

अजुनही समीरची पत्नी आणि मुलींची मुंबईतील धारावी पोलिस ठाण्यात चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र एटीएस टीमला हे जाणून घ्यायचे आहे की समीर मुंबई किंवा महाराष्ट्राच्या इतर काही भागात इतर काही लोकांच्या संपर्कात होता का? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरच्या पत्नीने पोलिसांना सांगितले आहे की तिला समीर दहशतवादी असल्याचा कधीच संशय आला नाही. ड्रायव्हर असलेला शेख दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेजारी आणि कुटुंबीयांना धक्का बसला आहे. ते म्हणतात की शेख हा ‘फॅमिली मॅन’ आहे आणि त्याने कधीच कोणाशीही मोठ्या आवाजात बोलले देखील नाही.

समीरचे कुटुंब मुंबई सेंट्रलच्या सायन परिसरातील एमजी रोडवरील कलाबाखर परिसरातील झोपडपट्टीत राहते. शेखच्या अटकेनंतर लगेचच मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक त्याच्या घरी पोहोचले आणि त्यांची अनेक तास चौकशी केली. समीरला दोन मुली आहेत. कुटुंबासह पोलिसांनी त्यांच्या शेजाऱ्यांचीही चौकशी केली आहे. समीर हा दहशतवादी आहे याबद्दल जवळजवळ प्रत्येकाने आश्चर्य व्यक्त केले आहे. येथून चौकशी केल्यानंतर रात्री मुंबईच्या इतर काही भागातही छापे टाकण्यात आले आहेत. मात्र तेथून काही जप्त करण्यात आले आहे की नाही हे मुंबई पोलिसांनी सांगितले नाही.

समीरला शस्त्रे पुरवण्याचे काम सोपवण्यात आले होते:
दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमचा निकटवर्तीय, समीरला अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्हशी संबंधित पाक-आधारित व्यक्तींनी भारतातील विविध संस्थांना IED, शस्त्रे आणि ग्रेनेड पोहोचवण्याचे काम सोपवले होते. तपास एजेंसीच्या मते, अनीसने आगामी सणासुदीच्या काळात भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करण्याचा दहशतवादी कट रचला होता. तपास संस्थेच्या मते, त्यांचा हेतू दिल्ली, यूपी, महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यांमध्ये लक्ष्य हत्या आणि स्फोट घडवून आणणे हा होता.

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक:
दरम्यान, या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचं उघड झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. वळसे-पाटील यांनी तातडीने पोलिसांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला एटीएसचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे रेल्वेनेही उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या बैठकीबाबत स्वत: माहिती दिली आहे. दिल्लीत सहा अतिरेक्यांना अटक करण्यात आली. ही संवेदनशील घटना आहे. देशाच्या स्तरावरील ही घटना आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र, या बैठकीतील कायदेशीर माहिती घेतल्यानंतरच त्यावर अधिक भाष्य करता येईल. आताच काही बोलणं योग्य होणार नाही, असं दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं. तसेच या बैठकीला पोलिसांच्या सर्व युनिटचे बडे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Maharashtra home minister Dilip Walse Patil call police meeting after six suspects terrorist arrest in Delhi.

हॅशटॅग्स

#TerrorPlan(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x