26 May 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फायदाच फायदा! 1,34,984 रुपये फक्त व्याज मिळेल Salary Rs.20,000 | पगार अवघा 20,000 रुपये असेल तरी 1 कोटी रुपये परतावा मिळेल, अशी करा स्मार्ट गुंतवणूक Deepak Nitrite Share Price | मालामाल करणाऱ्या शेअरच्या रेटिंगमध्ये बदल, अत्यंत स्वस्त प्राईसवर खरेदी करता येणार Hot Stocks | संधी सोडू नका! हे 6 शेअर्स अवघ्या 6 दिवसात 44 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, फायदाच फायदा Rekha Jhunjhunwala | श्रीमंत करणारे रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्सची लिस्ट, मजबूत ट्रेडिंग व्हॉल्यूम Adani Enterprises Share Price | स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत! शेअर रॉकेट तेजीने वाढणार, स्टॉक 'BUY' करावा? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत घसरला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या
x

एखाद्याविरुद्ध तक्रार करायची, मग तिथे जाऊन पर्यटन आणि प्रसिद्धी मिळवायची ही सोमैयांची सवयच आहे - हसन मुश्रीफ

Minister Hasan Mushrif

कोल्हापूर, १९ सप्टेंबर | सर्व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा. माझी तब्येत उत्तम आहे व काळजीचे काहीही कारण नाही, असे स्पष्टीकरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ यांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी एक पत्रक काढून कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी थंडी वाजून ताप आला होता. बैठक सुरू असताना ताप वाढतच असल्याचे माझ्या निदर्शनास आल्यामुळे मी तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. बॉम्बे हॉस्पिटल हे माझे नियमित तपासणीचे हॉस्पिटल आहे.

तक्रार करायची मग तिथे जाऊन पर्यटन आणि प्रसिद्धी मिळवायची ही सोमैयांची सवयच आहे – Minister Hasan Mushrif slams BJP leader Kirit Somaiya over allegations :

तीन दिवस उपचारानंतर मला डिस्चार्ज देण्यात आला:
डॉक्टरांनी डेंगूसदृश्य ताप असल्याचे निदान केले व त्याची साथ असल्याचे सांगितले. ताप उतरल्यानंतर प्लेटलेट्स कमी होतात, अशक्तपणा येतो. त्यामुळे तीन दिवस उपचारानंतर मला डिस्चार्ज देण्यात आला. परंतु, एक आठवडा विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला आहे. त्यामुळे मला पूर्वनियोजित अहमदनगरचा दौराही रद्द करावा लागला, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

सोमैयांना तक्रार करून पर्यटन आणि प्रसिद्धी मिळवायची सवय:
‘माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वास्तविक माझ्यावर व माझ्या कुटुंबियांवर चुकीची खोटी तक्रार करून आरोप केलेले आहेत. तसेच त्यांनी आरओसीमधून मिळवलेली कागदपत्रे केंद्रीय तपास यंत्रणांकडे दिलेली आहेत. यापूर्वीही केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापा, चौकशी झालेली आहे. दरम्यान, तपास यंत्रणा ज्यावेळेस चौकशी करतील त्याचे योग्य उत्तर आम्ही देऊन त्यांना सहकार्य करूच. परंतु; किरीट सोमय्या यांची ही स्टंटबाजी कशासाठी? त्यांना हा अधिकार कोणी दिला? कारण त्याना एक सवयच लागली आहे की तक्रार करायची व तिथे जाऊन पर्यटन करून प्रसिद्धी मिळवायची. त्यातूनच विनाकारण बदनामी करण्याचा प्रकार करावयाचा. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझ्यावर प्रेम करणारे, माझी ३० -३५ वर्षाची सामाजिक व राजकीय कारकीर्द माहित आहेत, ते स्वस्त बसणार नाहीत याची मला खात्री आहे,’ असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.

भाजपच्या कटकारस्थानाना बळी पडू नका:
भाजपच्या अशा कटकारस्थानाना बळी पडू नका. संयम ठेवा, त्यांना अडवू नका. त्यांना माझा सल्ला आहे, मराठ्यांचा शूरवीर व बाणेदार सरसेनापती संताजी घोरपडे यांचे जिवंत स्मारक असलेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना त्यांनी बाहेरून नव्हे आत जाऊन पाहावा. आमचे मोजकेच लोक स्वागत करतील. जगातील हा एक अद्भुत साखर कारखाना असून खाली गाळप व उंचच-उंच डोंगरमाथ्यावर साखर तयार केली जाते. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यात आलाच आहात तर माझ्या सर्व सामाजिक -राजकीय व ज्या- ज्या क्षेत्रामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली याबद्दल माहिती घ्यावी असं मुश्रीफ म्हणाले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Minister Hasan Mushrif slams BJP leader Kirit Somaiya over allegations.

हॅशटॅग्स

#HasanMushrif(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x