5 May 2024 2:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

विनाकारण मुश्रीफ यांना बदनाम करण्याचा प्रयत्न हाणून पाडू | आम्ही मुश्रीफ यांच्या पाठीशी - मंत्री सतेज पाटील

Guardian minister Satej Patil

कोल्हापूर, २४ सप्टेंबर | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपाचे नेते किरीट सोमैया यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी किरीट सोमैयांना इशारा दिला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खुलासा दिल्यानंतर सोमैयांनी कोल्हापुरात येण्याची गरज काय? विनाकारण मुश्रीफ यांना टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

विनाकारण मुश्रीफ यांना बदनाम करण्याचा प्रयत्न हाणून पाडू , आम्ही मुश्रीफ यांच्या पाठीशी – Guardian minister Satej Patil criticized BJP leader Kirit Somaiya over allegations against Hasan Mushrif :

सतेज पाटील पुढे म्हणाले, की सोमैया हे हसन मुश्रीफ यांना विनाकारण बदनाम करत आहेत. त्यांचा तो प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपा आणि सोमैया यांचा आहे. हाच प्रयत्न हाणून पाडू. मुश्रीफ यांनी यापूर्वीच खुलासा दिला असताना किरीट सोमैया यांना पुन्हा कोल्हापुरात येण्याची गरज काय? शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सोमैया यांनी कोल्हापुरात येऊ नये, अशी विनंती सतेज पाटील यांनी केली आहे. आम्ही मुश्रीफ यांच्या पाठीशी ठामपणे आहोत. मुश्रीफांच्यावरील आरोप निराधार आहेत. वेळ आल्यावर सर्व बाहेर येईल, असेदेखील पाटील म्हणाले.

मुश्रीफ यांचे काय म्हणणे?
किरीट सोमैया यांनी केलेले आरोप हे भाजपाच्या मोठ्या षडयंत्राचा भाग आहेत, असे मुश्रीफ यांनी सांगितले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे या प्रकरणाचे सूत्रधार आहेत. मी सतत केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या गैरवापराबद्दल बोलत होतो. म्हणून ते माझ्या मागे आहेत. पाटील यांनी त्यांना भाजपामध्ये येण्याची ऑफर दिल्याचा दावाही त्यांनी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Guardian minister Satej Patil criticized BJP leader Kirit Somaiya over allegations against Hasan Mushrif.

हॅशटॅग्स

#SatejPatil(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x