
मुंबई, २६ सप्टेंबर | ई-कॉमर्समधील प्रमुख कंपनी अमेझोनने (Amazon eCommerce) पुणे व मुंबई येथे मोठी गोदामे घेतली आहेत. तसेच मुंबईतील गोदामांचा विस्तार केला आहे. अमेझॉन कंपनीने महाराष्ट्रामध्ये एकूण दहा गोदामे उघडली आहेत. नऊ दशलक्ष क्युबिक फूट इतकी यांची क्षमता आहे. वराळे या गावात नवीन गोदाम ऊघडले आहे, जे ‘ पूर्तता केंद्र ‘ आहे.
Amazon eCommerce launches new warehouses in Pune and Mumbai metro cities :
अमेझॉनची राज्यातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आहे, असे अमेझॉनचा प्रवक्ता म्हणाला. सदर केंद्र ही MSME ना लघुउद्योजक, मध्यम उद्योग, व व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी सहाय्यक ठरतील.
अमेझॉनच्या वितरण व्यवस्थेतील ही सेंटर्स प्रमुख भाग आहेत. सात सॉर्टिंग सेंटर तसेच वितरण सेवा पार्टनर स्टेशन आणि दुकाने ग्राहकांना उत्तम व तत्पर सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत. प्रवक्ता म्हणाला की, “अमेझॉनने या सणासुदीच्या काळात १.१० लाख नवीन रोजगार संधी उपलब्ध केल्या आहेत. प्रवक्ता पुढे म्हणाला की, याच महिन्यात करिअर डे दिवशी अमेझॉन कंपनीने ८००० नवीन रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.”
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.