30 April 2024 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IRFC Share Price | IRFC सह हे टॉप 10 शेअर्स खरेदी करा, ट्रेडिंग व्हॉल्यूम विक्रम तोडत आहेत, मोठी कमाई होईल IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स आता सुसाट तेजीच्या दिशेने, तज्ज्ञांकडून स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राइस जाहीर Infosys Share Price | इन्फोसिस आणि TCS सह 7 IT शेअर्स मालामाल करणार, मिळेल 39 टक्केपर्यंत परतावा SBI Mutual Fund | अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक देईल 16 लाख रुपये परतावा Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार
x

Defamation Suit Against Kirit Somaiya | मानहानीप्रकरणी किरीट सोमय्या यांना कोर्टाकडून समन्स

Defamation Suit Against Kirit Somaiya

मुंबई, ०१ ऑक्टोबर | शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल केलाय. अनिल परबांच्या दाव्याची दखल घेत न्यायालयानंही आता किरीट सोमय्यांना फटकारलंय. अनिल परब यांच्या मानहानीप्रकरणी किरीट सोमय्या यांना समन्स बजावण्यात आलंय. 23 डिसेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे सोमय्यांना कोर्टानं आदेश दिलेत. अनिल परबांनी सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा (Defamation Suit Against Kirit Somaiya) दाखल केलाय.

Taking note of Anil Parab’s claim, the court has now slapped Kirit Somaiya. Kirit Somaiya has been summoned in Anil Parab’s defamation case. The court ordered Somaiya to appear before the court till December 23. Defamation Suit Against Kirit Somaiya :

तत्पूर्वी, सोमय्यांविरोधात दावा दाखल करत असल्याची माहिती अनिल परबांनी ट्विट करत दिली होती. किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केलाय, असं परब यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

किरीट सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसंच परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. परब हे स्वतःहून ED चौकशीला देखील जाऊन आले असून आता ते किरीट सोमैय्या यांच्याविरोधात अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Defamation Suit Against Kirit Somaiya Mumbai high court sent summon.

हॅशटॅग्स

#KiritSomaiya(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x