4 May 2024 3:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

व्हिडिओ: मोहन भागवतांनी ‘कब्रस्तान शमशान’चा उल्लेख करत मोदींना इशारा दिला?

नवी दिल्ली : मागील उत्तर प्रदेश निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारादरम्यान “शमशान कब्रस्तान” या शब्दांचा शिस्तबद्ध वापर केला होता. त्या निवडणुकीदरम्यान मोदींनी शमशान कब्रस्तान या शब्द तंत्राचा पुरेपूर उपयोग मतांच्या ध्रुवीकरणासाठी केला होता. दरम्यान, आरएसएस’चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शमशान-कब्रस्तान राजकारणावर टिका केली असून, समाजाच्या भल्यासाठी याचा उपयोग नसून ते केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकारण असल्याचे उद्गार काढले आहेत.

परंतु, मोहन भागवतांची ही ‘कब्रस्तान शमशान’ शब्दांवरील टीका म्हणजे नरेंद्र मोदींना दिलेला इशारा असल्याचं म्हटलं जात आहे. कारण, याच ‘कब्रस्तान शमशान’ शब्दाचा पुरेपूर उपयोग मोदींनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीदरम्यान अनेक सभांमधील भाषणात केला होता. त्यानंतर ‘कब्रस्तान शमशान’ या शब्द प्रयोगावरून उत्तर प्रदेशमध्ये मोठं वादंग निर्माण झालं होतं. हिंदू मुस्लिम समाजातील दरी वाढून ‘कब्रस्तान शमशान’ या शब्दाने भाजपला निवडणुकीत फायदा सुद्धा झाला होता.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना ‘कब्रस्तान शमशान’ वरून एक प्रश्न विचारण्यात आला होता. मतांच्या ध्रुवीकरणाचे राजकारण या संदर्भात हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत म्हणाले की, ‘शमशान-कब्रस्तान हे समाजाच्या भल्यासाठी नसून याचा उपयोग केवळ सत्ता मिळवण्यासाठी केला जातो’ असं विधान केलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “शमशान कब्रस्तान” हे दोन शब्द गेल्या वर्षी यूपी’तील निवडणूक प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणावर वापरले होते. मोहन भागवतांच्या या खुलाशामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या असून संघाचा हा नरेंद्र मोदींना इशारा आहे का असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

व्हिडिओ: हाच तो यूपी’च्या निवडणुकीतील मोदींच्या भाषणातील ‘कब्रस्तान शमशान’ शब्द प्रयोग

व्हिडिओ: मोहन भागवत म्हणाले ‘कब्रस्तान शमशान’ केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकारण

लवकरच मध्यप्रदेश आणि राजस्थान या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर पुढच्या वर्षी लोकसभेच्या व महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर भागवतांचे उद्गार हा म्हणजे नरेंद्र मोदींसाठी इशारा आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x