13 December 2024 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: RELIANCE
x

2022 Bajaj Pulsar N160 | 2022 बजाज पल्सर एन 160 बाईक भारतात लाँच | बेस्ट फीचर्स पहा

2022 Bajaj Pulsar N160

2022 Bajaj Pulsar N160 | बजाज ऑटोने आपली नवी बाईक पल्सर एन १६० भारतीय बाजारात आणली आहे. नवीन बजाज पल्सर एन १६० बाईकच्या सिंगल-चॅनेल एबीएस व्हेरिएंटची किंमत १.२२ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, ड्युअल-चॅनेल एबीएस व्हेरिएंटची किंमत 1.27 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. चला जाणून घेऊयात नवीन बजाज पल्सर एन 160 बाईकमध्ये काय खास आहे.

पल्सर एन १६० : डिझाइन आणि कलर ऑप्शन्स :
डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर ही बाईक पल्सर एन 250 सारखीच दिसते. बाइकमध्ये ट्विन एलईडी डीआरएल, शार्प टँक एक्सटेंशन्स, इंजिन सेफ्टीसाठी अंडरबेली काउल्स, स्टबी एक्झॉस्ट, मल्टी स्पोक अलॉय व्हील आणि एलईडी टेल लॅम्पसह प्रोजेक्टर हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. कलर ऑप्शनबद्दल बोलायचं झालं तर सेगमेंटचा पहिला ड्युअल-चॅनल एबीएस व्हेरिएंट फक्त ब्रुकलिन ब्लॅक शेडमध्येच दिला जाणार आहे. मात्र, अधिक परवडणारे सिंगल-चॅनेल एबीएस मॉडेल कॅरेबियन ब्लू, रेसिंग रेड आणि ब्रुकलिन ब्लॅक या एकूण तीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

पल्सर एन 160: इंजीन सहित अन्य डिटेल्स :
पल्सर एन १६० मध्ये १६४.८२ सीसी, सिंगल सिलिंडर, फोर स्ट्रोक, ऑइल कूल्ड, फ्युएल इंजेक्टेड इंजिन आहे. ही मोटर १५.७ बीएचपीची पॉवर आणि १४.६ एनएमची पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. नवीन बजाज पल्सर एन १६० बाईकच्या सिंगल-चॅनेल एबीएस व्हेरिएंटची किंमत १.२२ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, ड्युअल-चॅनेल एबीएस व्हेरिएंटची किंमत 1.27 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.

कंपनीने निवेदनात काय म्हटले :
बजाज ऑटोचे प्रेसिडेंट-मोटरसायकल सारंग कानडे म्हणाले, ‘वीस वर्षांपूर्वी पल्सरने भारतात स्पोर्ट्स-बाइक्सची ओळख करून दिली. ऑक्टोबर 2021 मध्ये नवीन प्लॅटफॉर्मवर लाँच करण्यात आलेल्या पल्सर 250 ला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. आम्ही नवीन प्लॅटफॉर्म १६० सीसी सेगमेंटपर्यंत वाढविण्यास उत्सुक आहोत. नवीन पल्सर एन 160 विलक्षण आहे, जे स्ट्रीट रायडिंगच्या परिपूर्ण अनुभवासाठी डिझाइन केलेले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 2022 Bajaj Pulsar N160 launched check price in India 23 June 2022.

हॅशटॅग्स

#2022 Bajaj Pulsar N160(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x