28 June 2022 10:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Global Surfaces IPO | ग्लोबल सरफेस कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या HTC Desire 20 Pro | एचटीसी डिझायर 20 Pro स्मार्टफोन लाँच | 64 एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स आदित्य ठाकरेंनी प्रचार-मेळाव्यातून टीकेचा सपाटा लावताच शिंदेंचा जळफळाट? | पहिल्यांदाच दिलं प्रतिउत्तर Horoscope Today | 29 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल शिंदेंचं भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदासाठी फिक्सिंग झालंय? | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर नकारात्मक प्रतिउत्तर IPO Investment | व्हिस्की मेकर कंपनी ऑफिसर्स चॉइस IPO लाँच करणार | गुंतवणुकीची संधी Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा
x

तर एकनाथ शिंदे यांच्यावरही नारायण राणे यांच्यासारखीच वेळ येईल | राणेंचाही असाच समज झाला होता | सविस्तर वाचा

Eknath Shinde

Eknath Shinde | बंडखोर एकनाथ शिंदे याच्या गटात सामील होणाऱ्या शिवसेना आमदार नेत्यांची संख्या वाढताना दिसत आहेत. शिवसेनेचे आणखी सहा आमदारांसोबत शिवसेनेचा संपर्क होत नाही. सध्या गुवाहाटीमध्ये जवळपास 45 आमदार उपस्थित आहेत. त्यात आता आणखी आमदार संपर्कात नसल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतील दोन आमदार नॉटरिचेबल आहेत.

शिवसेनेचं चिन्हं शिंदे गटाकडे जाण्याची धास्ती :
सध्या गुवाहाटीमध्ये जवळपास 45 आमदार उपस्थित आहेत. त्यात आता आणखी आमदार संपर्कात नसल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. त्यात एकूण प्रमाण पाहिल्यास संपूर्ण शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेल्याचा संदेश काही यंत्रणा इतर आमदारांना देत आहेत. परिणामी उरलेले आमदारही आसामला पळ काढत आहेत. मात्र यातून उद्धव ठाकरे यांना राजकीय दृष्ट्या पूर्णपणे संपवून टाकायचं अशी क्रूर राजकीय योजना आखल्याची माहिती समोर येतं आहे.

मुंबई आणि ठाणे या महानगरपालिका शिवसेनेच्या हातून जाणार ?
राज्यातील घडामोडी पाहता याचा थेट परिणाम आगामी स्थानिक निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मुंबई आणि ठाणे या महानगरपालिका शिवसेनेच्या हातून काढून घेण्याची योजना आहे आणि त्यानंतर शिवसेना पूर्णपणे संपवून टाकायची अशी रणनीती आहे असं म्हटलं जातंय. आगामी बऱ्याच निवडणुकीत याचे परिणाम पाहायला मिळतील यात शंका नाही.

एकनाथ शिंदेंचं सड्याचं बंड हे केवळ भाजपच्या मदतीमुळे उजवं ठरतंय आणि अन्यथा ते एक फुसका बार ठरले असते. केंद्र सरकारच्या मदतीने सर्वकाही होतं असल्याने ते निश्चिन्त दिसत आहेत आणि त्याला कारण आहे सर्वकाही भाजपने रचलेल्या योजनेप्रमाणे आहे. यामध्ये त्यांना आसाम मधून २-३ त्याच-त्याच प्रतिक्रिया देण्याचे आदेश आहेत असं दिसतंय. तसेच सांगितलं गेलंय तेवढच ते करत आहेत. शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह सर्वकाही ताब्यात घेण्याची रणनीती सुद्धा भाजपची आहे. एकनाथ शिंदे हे केवळ कॉलवरून नियंत्रित केले जात आहेत हे देखील स्पष्ट होतंय. पण सध्या ते मृगजळाच्या असल्याने त्यांची अवस्थाही काही महिने किंवा वर्षात नारायण राणे यांच्याप्रमाणे किंवा अत्यंत भीषण होऊ शकते असं बोललं जाऊ लागलं आहे. समजून घेऊया ती तुलना..

असाच प्रयोग नारायण राणेंनी केला होता पण…
माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील महाराष्ट्राच्या राजकारणातील आक्रमक नेते म्हणून परिचित असलेले नेते. काही वर्षांपूर्वी नारायण राणे यांचं बंड देखील महाराष्ट्रात गाजलं होतं. विशेष म्हणजे त्यांचं ते बंडे देखील उद्धव ठाकरे यांच्या विरोधातच होतं. त्यावेळी देखील नारायण राणे यांच्या बंडामुळे संपूर्ण शिवसेना हादरली होती. विशेष म्हणजे त्या वेळी स्वतः बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत कार्यरत होते. असं असताना देखील नारायण राणे यांच्यासोबत अनेक आमदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून नारायण राणे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळीही शिवसेना संपली असा समज पसरला होता.

नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांचे बंड :
सध्याची एकनाथ शिंदे यांची भूमिका ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यामागील मुख्य कारण हे राजकीय भूकच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मातब्बर नेते सोबत असताना आपल्याला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होणे अशक्य आहे हे त्यांना चांगलच ठाऊक आहे. त्यासाठी त्यांनी आधार घेतला आहे हिंदुत्वाच्या मुद्याचा आणि भाजपच्या केंद्रीय यंत्रणेचा. नारायण राणे यांच्या बाबतीतही तेच होतं, त्यांनाही थेट उद्धव ठाकरेंची जागा घ्यायची होती किंवा स्वतःचा पक्षामध्ये दबदबा निर्माण करून आपले समर्थक पक्षात ठेवायचे होते. आज आणि तेव्हा व्यक्ती आणि परिस्थिती निरनिराळी असली तरी राजकीय भूक मात्र तीच होती.

नारायण राणे यांनीही अनेक आमदार फोडले होते :
त्यावेळी आक्रमक नारायण राणे यांचा शिवसेनेमध्ये पूर्ण दबदबा होता. अनेक आमदारांचा असा समज होता की आपण नारायण राणे यांच्यामुळेच निवडून येत होतो आणि त्याला कारण होतं मिळणारा आर्थिक पुरवठा. त्यामुळे नारायण राणे जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत अनेक आमदारही बाहेर पडले होते. विशेष म्हणजे शिवसेनेतील त्या काळातील आक्रमक आमदार म्हणून ओळखले जाणारे आमदार त्यामध्ये होते. कालांतराने नारायण राणे इकडून तिकडून पक्ष बदलू लागले आणि या सर्व समर्थक आमदारांची नंतर राजकीय फजिती झाली. राणे केवळ स्वतःची आणि त्यांच्या मुलांचीच राजकीय सोय करत आहेत हे समर्थक आमदारांना दिसू लागले. अनेक नारायण राणे समर्थक आमदार निवडणुकीत पराभूत झाले तसेच अनेक जण राजकारणात असूनही संपल्यात जमा होते. हेच कालांतराने एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाबतीत होऊ शकते यात कोणताही वाद नाही. कारण सध्याचे राजकारण हे शिंदे पिता-पुत्रांच्या भल्यासाठीच आहे हे देखील कालांतराने अधोरेखित होईल

राणेंनी नवा पक्ष काढला..पण :
राजकीय इच्छा पूर्ण होत नसल्याने नारायण राणे यांनी देखील शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास केला आहे. शिवसेनेसोबत वाकडी झाल्यानंतरच भाजपने नारायण राणे यांना राजकीय पुनर्जन्म दिला आणि केवळ शिवसेनेला टार्गेट करणे हे एकमेव लक्ष दिल्याचं देखील वारंवार समोर येत आहे. आपल्याला मिळालेल्या केंद्रीय मंत्रीपदाचा आपण महाराष्ट्राच्या भल्यासाठी कसा फायदा करून देत आहोत यासाठी कधीच ते पत्रकार परिषद घेताना दिसले नाहीत. जेव्हा जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये केवळ उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे हा एकमेव मुद्दा दिसून येतो.

राणेंचा समज खोटा ठरला :
पण भाजपमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा स्वाभिमानी पक्ष काढला होता. स्वतःचा राजकीय पक्ष काढल्यानंतर नारायण राणे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा देखील केला होता. आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री आहोत आणि त्यामुळे संपूर्ण राज्यात आपण सामान्य लोकांना हवा असलेला राजकीय चेहरा आहोत असा त्यांचा समज होता. मात्र पक्ष चालवणे इतकं सोपं काम नव्हतं हे त्यांना समजलं होतं. आणि पक्ष चालवायचा म्हटल्यावर पक्ष नैतृत्वाला एक चेहरा लागतो हे देखील त्यांच्या ध्यानात आलं होतं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आयत्यावेळी स्वतःचा पक्ष भाजपमध्ये विलीन करून स्वतःची राजकीय फजिती थांबवली होती.

राणेंची एक उजवी बाजू – शिंदेंकडे तो गुण अजिबात नाही :
मात्र नारायण राणे यांच्याकडे असलेला एक गुण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अजिबात नाही हे मान्य करावे लागेल. ते म्हणजे नारायण राणे यांच्या मध्ये खूप धमक होती. नारायण राणे यांनी केलेले ते बंड थेट मातोश्रीच्या अंगणात आणि महाराष्ट्र, मुंबईत राहूनच केलं होतं. तसेच त्यांचे समर्थक आमदार आणि पदाधिकारी थेट शिवसैनिकांच्या अंगावर धावून जायचे. मात्र सध्या एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत ते दिसून येतं नाही. ते पूर्णपणे डरपोक आहेत हे देखील अधोरेखित होते आहे. म्हणूनच ते सर्व राजकीय सूत्र दुसऱ्या राज्यातून आणि प्रचंड पोलिस संरक्षणात करत आहेत. यातून त्यांचा स्वतःवर आणि इतर आमदारांवर देखील भरोसा नसल्याचे दिसते. त्यामुळे प्रत्यक्ष महाराष्ट्रात आल्यावर ते किती काळासाठी टिकाव धरू शकतील हे सांगणे कठीण आहे.

एकनाथ शिंदे ‘गटा तटाचे नेते’ – सामान्यांचा चेहरा नव्हे :
एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रातील सामान्य लोकांना हवा असलेला चेहरा नाहीत. ते केवळ आयत्यावेळी स्थानिक पातळीवर गटातटाचे राजकारण करणारे नेते आहेत. बोलण्याचे कौशल्य आणि सामर्थ्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अजिबातच नाही. सभा गाजवण्यासाठी सुद्धा एक चेहरा लागतो, मात्र हा गुण एकनाथ शिंदे यांच्याकडे अजिबात नाही. महाराष्ट्रातील राजकारणावरून ते परराज्यातून कशी सौदेबाजी करत आहेत ते संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत जर काही झालं तर ती लोकांच्या मनात निर्माण झालेली चिड असेल असं सध्याच्या वातावरणावरून कळतंय. मंत्रिपदी बसले तरीपण गटातटाच राजकारण एवढेच त्यांचे नाव लौकिक राहिले आहे. त्यामुळे राज्यातील सामान्य लोकांचा स्वीकृत चेहरा नसल्यामुळे एकनाथ शिंदे यांचं ही तेच होणार आहे नारायण राणे यांचा झालं असं राजकीय तज्ञ सांगतात.

भाजपात विलीन करण्याची वेळ येऊ शकते :
त्यामुळे राज्यातील सामान्य लोकांचा स्वीकृत चेहरा नसल्यामुळे एकनाथ शिंदे यांचं ही तेच होणार आहे नारायण राणे यांचा झालं असं राजकीय तज्ञ सांगतात. त्यामुळे त्यांनी स्थापन केलेला गट देखील दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतो. तसेच अनेक आमदार पुन्हा शिवसेनेतही परतू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde political way may like Narayan Rane check details 22 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x