Honda Amaze Facelift 2024 | होंडा कारने आपलं नवीन मॉडेल ‘होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024’ नुकतंच भारतात लॉन्च केलं आहे. या नव्या मॉडेलमध्ये कंपनीने बरेच मोठे मोठे बदल केलेले पाहायला मिळत आहेत. तसं पाहायला गेलं तर कारची संपूर्ण डिझाईनच बदलली आहे.
जाणून घ्या होंडाच्या अमेझ फेसलिफ्टचे फीचर्स :
या नव्या कारच्या लखलखित फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, मोठ्या बदलानुसार कारमध्ये एलईडी बाईक प्रोजेक्टर हेडलाईट, अँड्रॉइड ऑटो, ॲपल कार प्ले, 15 इंचचे टायर, फ्लोटिंग टच स्क्रीन टॉगल स्विच त्याचबरोबर डिजिटल एसी यांसारख्या अनेक सुविधा कारमध्ये दिल्या गेल्या आहेत. हे जबरदस्त फीचर्स ऐकून तरुण भारावून गेले आहेत.
होंडाची ही कार देणार पूर्णपणे सेफ्टी :
होंडाच्या या नवीन सिरीजमध्ये सेफ्टीसाठी देखील अत्यंत उत्तम दर्जाचे फीचर पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये स्पिडिंग अलर्ट, जिओ फेन्स अलर्ट, कार लोकेशन, ऑटो क्रॅश नोटिफिकेशन, स्टोलन व्हीकल ट्रॅकिंग, ड्राईव्ह रेकॉर्डर यांसारख्या बऱ्याच सुविधा दिल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर 28 हून अधिक सेफ्टी फीचर्स यामध्ये पाहायला मिळतील.
होंडाच्या या नव्या कारची किंमत किती :
सध्या होंडाच्या होंडा अमेझ 2024 या कंपनीने ZX, VX, आणि V या व्हेरियंटवर ऑफर केली आहे. होंडा अमेझ 2024 च्या ZX ची किंमत 9.69 लाख रुपये आहे. त्याचबरोबर इतर दोघांची किंमत 8 ते 9 लाखांच्या दरम्यान असलेली पाहायला मिळेल. या कारचे इंजिनही अतिशय कमालीचे आहे. यामध्ये 1.2 लिटर इंजिनची क्षमता आहे. ही जबरदस्त कार 18.65 किलोमीटर 1 लिटरमध्ये धावते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Honda Amaze Facelift 2024 04 December 2024 Marathi News.
