15 December 2024 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

2022 Hero Xtreme 160R | 2022 हिरो एक्स्ट्रीम 160R भारतात लाँच, किंमत आणि जबरदस्त फीचर्स जाणून घ्या

2022 Hero Xtreme 160R

2022 Hero Xtreme 160R | हिरो मोटोकॉर्पने आपल्या प्रीमियम 160 सीसी बाइक एक्सट्रीम 160R चे अपडेटेड व्हर्जन सादर केले आहे. २०२२ हिरो एक्सट्रीम १६० आर ही नवी बाईक भारतात १.१७ लाख रुपये ते १.२२ लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या किंमतीत लाँच करण्यात आली आहे. या बाईकमध्ये काही नवीन फिचर्सची भर पडली आहे. मात्र, जुन्या मॉडेलच्या तुलनेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. जाणून घेऊयात या नव्या व्हर्जनमध्ये काय खास आहे.

हे बदल करण्यात आले आहेत :
कंपनीने एक्सट्रीम 160 आर मध्ये री-शेप्ड सीट आणि एक्सटर्नल पिलियन ग्रॅब रेल सादर केली आहे. बाइकच्या आधीच्या मॉडेल्समध्ये फिजिकल ग्रॅब रेलऐवजी सीटखाली जागा असायची जी फारशी प्रॅक्टिकल नव्हती. 160 सीसीच्या या प्रीमियम बाईकमध्ये इनव्हर्टेड डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आहे, ज्यात आता गिअर पोझिशन इंडिकेटर देखील आहे.

इंजिनसह इतर तपशील :
नवीन हिरो एक्सट्रिम १६० आर मध्ये बीएस६ कम्प्लायंट १६३ सीसी, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड, फ्युएल इंजेक्टेड इंजिन आहे जे ८,५०० आरपीएमवर १५ बीएचपी आणि ६५०० आरपीएमवर १४ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते आणि ते 17-इंच ट्यूबलेस टायरवर चालते.

सस्पेंशन ड्युटीसाठी एक्सट्रीम १६० आर मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि रियरमध्ये ७-स्टेप अॅडजस्टेबल गॅस-चार्ज मोनो-शॉक शोषक मिळतो. ब्रेकिंग ड्युटीसाठी दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक दिले जातात आणि सिंगल-चॅनेल एबीएस देखील मिळतात. २०२२ हिरो एक्स्ट्रीम १६० आर बाइक तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली असून तिची किंमत १.१७ लाख ते १.२२ लाख रुपये (एक्स शोरूम) दरम्यान आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 2022 Hero Xtreme 160R launched in India check price details 29 July 2022.

हॅशटॅग्स

#2022 Hero Xtreme 160R(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x