Beauty First | खडबडीत त्वचेला मेकअपने द्या असा स्मूथ लुक - नक्की वाचा

मुंबई, २८ जून | त्वचा एकसमान नसण्याची कारणे अनेक असू शकतात. काहींची पहिल्यापासून त्वचा अनइव्हन म्हणजेच एकसमान नसते. तर काहींच्या त्वचेवर पिंपल्स, डेड स्किन जमा झाल्यामुळे त्वचा खडबडीत दिसू लागते. कधी त्वचेचे पोअर्स मोकळे राहिल्यामुळे त्वचा खडबडीत दिसू लागते. कारण काही असलं तरी प्रत्येकाला त्वचा इव्हन टोनची अथवा टेक्चरची दिसावी असं वाटत असतं. काहींची त्वचा कोरडी असल्यामुळे अथवा खडबडीत असल्यामुळे ती काही काळापुरती एकसमान दिसत नाही. फार काळ उन्हाच्या संपर्कात राहिल्यामुळे, अती प्रदुषणामुळेही तुमचा स्किन टोन एकसमान दिसत नाही. मग अशा त्वचेला इव्हन टोनमध्ये आणण्यासाठी थोडा मेकअप करणं नक्कीच गरजेचं आहे. जर तुमच्या स्किन टोनला स्मूथ करायचं असेल तर तुम्ही काही मेकअप टिप्स तुम्ही फॉलो करू शकता ज्यामुळे तुमची त्वचा एकसमान दिसू लागेल. यासोबतच त्वचेची योग्य काळजी घ्या आणि त्वचेला योग्य पद्धतीने क्लिन करा. ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने सुंदर आणि मऊ होईल.
प्रायमर निवडाना काय काळजी घ्याल:
जर तु्म्हाला तुमच्या खडबडीत त्वचेला एकसमान लुक द्यायचा असेल तर चांगलं प्रायमर वापरायला हवं. यासाठी तुम्ही सिलिकॉन बेस्ड प्रायमर तुमच्या त्वचेसाठी निवडू शकता. स्किन टेक्चर सुधारण्यासाठी सिलिॉन प्रायमर वापरणे नक्कीच फायद्याचं ठरेल. कारण यामुळे तुमची त्वचा मॉईच्सराईझ होईलच शिवाय त्वचेतील मऊपणा टिकून राहिल. सिलिकॉन प्रायमरने तुमच्या त्वचेवरील ओपन पोअर्स पॅक झाल्यामुळे तुमची त्वचा इव्हन टोनची दिसेल. सिलिकॉन प्रायमर तुम्मही फांऊडेशन ब्रश अथवा तुमच्या हाताच्या बोटांनी चेहऱ्यावर लावू शकता.
नेहमी लिक्विड फाऊंडेशन निवडा:
प्रायमर लावल्यानंतर सर्वांत महत्त्वाचं असतं फाऊंडेशन निवडणं. जर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी एखादं क्रीम अथवा मॅट फाऊंडेशन निवडलं तर तुमच्या चेहऱ्यावर लगेच क्रॅक दिसू लागतील. शिवाय यामुळे तुमच्या स्किनचे टेक्चर खराब होईल. यासाठीच खडबडीत त्वचेवर नेहमी लिक्विड फाऊंडेशन लावावे. कारण लिक्विड फाऊंडेशन तुमच्या त्वचेवर लवकर ब्लेंड होते आणि तुमचा चेहरा एकसमान दिसू लागतो.
कन्सिलरचा वापर करा थोडाच:
खडबडीत त्वचेवरील काळेडाग, पिंपल्स, पिंगमेंटशन लपवून त्वचा एकसारखी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्वचेला कन्सिलर लावणे. मात्र लक्षात ठेवा जास्त कन्सिलर वापरू नका. ज्या ठिकाणी तुम्हाला गरज वाटेल तेवढ्याच भागावर कन्सिलर लावा. शिवाय ते नंतर व्यवस्थित ब्लेंड करा ज्यामुळे तुमचा स्किन टोन समान वाटू लागेल.
सेटिंग पावडर आहे मस्ट:
मेकअप करताना तो व्यवस्थित सेट करण्यासाठी सेटिंग पावडर अथवा बनाना पावडर तुम्ही वापरू शकता. तुम्ही फाऊंडेशन, कन्सिलर पावडरने सेट करू शकता. तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला मेकअपची जशी फिनिशिंग हवी तशी तुम्ही पावडर वापरू शकता.
हायलायटरचा करा कौशल्याने वापर:
नेहमी नाही पण एखाद्या खास कार्यक्रमासाठी तुम्ही मेकअप करताना सर्वात शेवटी हायलायटर वापरू शकता. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काही महत्त्वाचे उंचवटे जसे की, नाक, कपाळ, हनूवटी, गाल उठावदार दिसतील. मात्र हायलायटर वापरताना ते अगदी कमी प्रमाणात आणि तुमच्या स्किनटोनला साजेसं निवडा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: How to smoothen rough skin texture with makeup health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Financial Mistakes | तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर या 5 चुका करू नका | फायद्यात राहाल
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Multibagger Stock | जबरदस्त शेअर | 490 टक्के परतावा देत गुंतवणुकीचा पैसा पाचपट केला
-
Netflix Livestreaming | नेटफ्लिक्सवर नवीन लाईव्हस्ट्रीमिंग फीचर येणार | लाईव्ह कंटेंट पाहता येणार
-
Multibagger Stock | जबरदस्त मल्टिबॅगर शेअर | 250 टक्के परतावा देणारा हा स्टॉक गुंतवणूकदारांचा फेव्हरेट
-
Multibagger Stocks | या शेअर्सनी पैसा 1 महिन्यातच अनेक पटींनी वाढवला | स्टॉक्सची यादी सेव्ह करा
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Salary Appraisal | सॅलरी अप्रेजल | यावेळी बहुतांश लोकांचा पगार वाढू शकतो - अहवाल
-
Hot Stocks | या मिड-कॅप कंपन्यांचे शेअर्स म्युच्युअल फंडांनी खरेदी केले | फायद्याचा स्टॉक्सवर लक्ष ठेवा