20 August 2022 7:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Career Horoscope | 20 ऑगस्ट, करिअरच्या दृष्टीने 12 राशींच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Ank Jyotish | 20 ऑगस्ट, शनिवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Horoscope Today | 20 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या MSSC Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 7000 जागांसाठी मोठी भरती, ऑनलाईन अर्ज करा Multibagger Stocks | धमाकेदार शेअर, दीड वर्षात गुंतवणूक 41 पटीने वाढली, हा स्टॉक भविष्यातही मोठा परतावा देऊ शकतो Investment Tips | दररोज फक्त 20 रुपये गुंतवणूक करा, छोट्या गुंतवणुकीतूनही 10 कोटी रुपये परतावा मिळू शकतो, संपूर्ण गणित जाणून घ्या Mutual Funds | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींहून अधिक परतावा घेऊ अर्थसंपन्न व्हा
x

तेजस्वी यादव महागठबंधन सरकार स्थापनाच्या तयारीत | आमदारांना पाटण्यातच थांबण्याचा आदेश

Tejashwi Yadav, RJD, Mahagathbandhan

पाटणा, १२ नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपप्रणीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पदी बसविण्याच्या हालचाली भाजपच्या गोटातून सुरु झाल्या आहेत. एकाबाजूल बिहारमध्ये एनडीएच सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु असताना दुसऱ्याबाजूला तेजस्वी यादव यांनी महागठबंधन सरकार स्थापन होईल असं सांगत आमदारांच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

यामुळे बिहारमध्ये नवं सरकारच्या स्थापनेच्या हालचाली दोन्ही बाजूने सुरु राहतील अशी चिन्हं दिसू लागली आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाल्यास आश्चर्य वाटायला नको. निकालानंतर पहिल्यांदाच तेजस्वी यादव यांनी नवनियुक्त आमदारांसोबत बैठक घेत सर्वांचे अभिनंदन केले. तसंच पत्रकार परिषदही घेतली.

आजच्या पक्ष बैठकीत बोलताना तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन करणार असल्याचं म्हटलं आहे. तेजस्वी यादव यांनी यावेळी RJD’च्या सर्व विद्यमान आमदारांना आपल्या मतदारसंघात न परतता पुढील एक महिना बिहारची राजधानी पाटण्यातच थांबण्याचा आदेश दिला आहे. विकासशील इन्सान पार्टी आणि हिंदुस्थान आवाम मोर्चाचा एनडीएमध्ये कशा पद्धतीने समावेश होते हे पाहून पुढील रणनीती ठरवली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे.

 

News English Summary: After the results of the Bihar Assembly elections, the BJP-led NDA has got a clear majority and is preparing to form a government. The move to reinstate the incumbent Chief Minister Nitish Kumar has started from the BJP faction. On the one hand, while the movement for the formation of NDA government is underway in Bihar, on the other hand, Tejaswi Yadav has raised the hopes of the MLAs by saying that a Mahagathbandhan government will be formed.

News English Title: Tejashwi Yadav tells RJD Mahagathbandhan will form government news updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x