नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो'कडून रिया चक्रवर्ती विरुद्ध FIR दाखल | अटकेची शक्यता
नवी दिल्ली, २६ ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणी ड्रग्जचा पुरवढा होत असल्याची माहिती मिळाल्याने Narcotics Control Bureau म्हणजे NCBने रिया विरुद्ध FIR दाखल केला असून त्यामुळे रिया चक्रवर्ती आणखी अडचणीत आली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सीबीआय, ईडी आणि Narcotics Control Bureau, NCB या तपास संस्था या प्रकरणात चौकशी करत आहेत.
सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती यांना ड्रग्जचा पुरवढा केला जात होता याचे पुरावे ईडी ला मिळाल्याचा दावा NCBचे संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे. त्यानंतर रिया विरुद्ध कलम 20, 22, 27, 29 NDPS Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने NCBला पाठविलेल्या पत्रात ड्रग्ज संदर्भात पुरावे देण्यात आल्याची माहितीही अस्थाना यांनी दिली आहे. यामुळे आता NCB सुद्धा त्या अँगलने तपास करणार आहे.
Narcotics Control Bureau registers a case in #SushantSinghRajput‘s death. pic.twitter.com/PhBj2mZRb6
— ANI (@ANI) August 26, 2020
रिया चक्रवर्तीचे काही व्हॉट्सऍप चॅट समोर आल्यामुळे या प्रकरणात ड्रग्जचा संशय समोर आला आहे. या व्हॉट्सऍप चॅटमध्ये ड्रग्जबाबत बोलणी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिया ज्या मिरांडा सुशीसोबत चॅटिंग करत होती, तो दुसरा-तिसरा कोणी नसून सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा असल्याचं समोर येत आहे.
समोर आलेल्या या WhatsApp chatमध्ये रिया गौरवला एमडी म्हणजेच Methylenedioxymethamphetamine या अतिशय स्ट्राँग ड्रगविषयी विचारताना दिसत आहे. ‘आपण स्ट्राँग ड्रग्जविषयी सांगावं तर, मी कधी त्यांचा वापर केलेला नाही’, असं रियाचं २०१७ मधील बोलणं समोर आलं आहे. एमडीबाबत तुला काही ठाऊक आहे का, असंही तिनं विचारल्याचं कळत आहे.
News English Summary: The Narcotics Control Bureau (NCB) on Wednesday filed a criminal case against Rhea Chakraborty and others for their alleged dealings in banned drugs, officials said. They said various sections of the Narcotic Drugs and Psychotropic Substances Act (NDPS) have been pressed in the complaint filed by the federal anti-drugs agency on an official reference received from the Enforcement Directorate (ED).
News English Title: Bollywood Actor Sushant Singh Rajput death case narcotics control bureau registers a case News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा