29 March 2024 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर
x

वेबसाईटवरच लिहिलंय बनावट बातम्या | कंगनाकडून शिवसेनेला लक्ष करताना वापर

Kangana Ranaut trolled, sharing satire websites, Facebook mark, Shivsena, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १५ सप्टेंबर : अनेकदा हे सिद्ध झालं आहे की इंटरनेटवर दिसणाऱ्या सर्वच गोष्टी सत्य नसतात किंवा त्या अर्धसत्य असतात. त्यामुळे अनेकदा खोटी वृत्त प्रसिद्ध होतात किंवा एखाद्याच्या बदनामीसाठी इंटरनेटवरील खोट्या वृत्तांचा आसरा घेतला जातो. समाज माध्यमांवर देखील मोठ्या प्रमाणावर खोट्या बातम्या प्रसिद्ध होतं असल्याने फॅक्ट-चेक सारखे विषय समोर आले आहेत.

मात्र सध्या प्रकाशझोतात असणाऱ्या कंगनाने सुद्धा शिवसेनेच्या द्वेषातून कोणतीही शहानिशा न करता खोट्या बातम्यांचा आसरा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. विडंबनसाठी निर्माण झालेलय वेबसाइटवरील वृत्त कोणतीही खात्री न करता शेअर केली आणि मोठ्याप्रमाणावर ट्रॉल झाली आहे. सदर वेबसाईटने एक लेख पोस्ट केला असून त्यात दावा केला होता की फेसबुकने “शिवसेनेच्या गुंडांपासून स्वत: ला सुरक्षित ठेवा” असा फिचर दिला आहे. नौदलाच्या बुजुर्ग हल्ल्यासह अलीकडील घटनेमुळे फेसबुकने सदर पर्याय यूजर्सला दिल्याचं त्यात म्हटलं आहे.

विशेष म्हणजे कंगनाने ट्विटरवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘फेसबुकच्या “विवेकी” कृतीबद्दल खूप धन्यवाद धन्यवाद दिले. “फेसबुक धन्यवाद, लोकशाहीमध्ये तुमचा आवाज सर्वांपर्यंत जाणं आवश्यक आहे. कोविड १९ विषाणूसारख्या सोनिया सेनेच्या गुंडांपासून लोकांचे रक्षण होणे आवश्यक आहे, विचारशील, चांगले काम केल्याबद्दल धन्यवाद,’ अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. वास्तविक अशा प्रकारचा कोणताही पर्याय फेसबुकने त्यांच्या ग्राहकांना उपलब्ध करून दिलेला नाही, मात्र कंगना शिवसेना द्वेषाने पछाडली गेली आहे यात वाद नाही.

 

News English Summary: Time and again, people have proved that the internet is not always truthful. And at the same time, thousands have continued to fall for fake news, despite all indications that might suggest otherwise. And the lastest entrant to this dubious list seems to be actor Kangana Ranaut. Satirical news website The Fauxy on Monday posted an article claiming that Facebook had launched a “mark yourself safe from Shiv Sena goons” feature.

News English Title: Kangana Ranaut trolled for sharing satire websites take on Facebook mark yourself safe from shivsena feature Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x