30 April 2025 12:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
x

डिजिटली वातावरण बिघडवलं | पोलिसांकडून कंगनाला व्हाट्सअँपवर डिजिटल नोटीस

Mumbai Police Summons Kangana Ranaut, Sister Rangoli Chandel

मुंबई, २१ ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिला वांद्रे पोलीस चौकशी बोलावणार आहेत. येत्या सोमवारी तिला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. कंगनाला मुंबईपोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपवर नोटीस पाठवली आहे. कंगनासह तिची बहीण रंगोलीलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोघींना सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी कंगना रणौत हिच्यासह तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल हिच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणे, धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात एक याचिकाही दाखल करण्यात आली होती. कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्यानं असं म्हटलं होतं की, हिंदू कलाकार आणि मुस्लिम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे.

कंगनाविरोधात भादवी कलम 153(A), 295(A), 124, 34 IPC अंतर्गत FIR दाखल झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रणौतने नेपोटिझम, फेव्हरेटिझम, बॉलिवूडमधील स्टार किड्स, ड्रग प्रकरण इ. अशा अनेक वक्तव्याबाबत भाष्य केले आहे. बॉलिवूडमधील अनेकांना तिने लक्ष्य केले आहे. याप्रकरणी कंगना रणौतची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

News English Summary: Actor Kangana Ranaut and her sister Rangoli Chandel have been summoned by Mumbai police next week in connection with an FIR registered against them at Bandra police station, news agency ANI reported on Wednesday. The charges against them include that of sedition (Section 124A of the Indian Penal Code). They two have been summoned on October 26 and 27, according to ANI. The FIR was registered on Friday on the orders of a local court in Mumbai for allegedly promoting enmity between different communities and other charges.

News English Title: Mumbai Police Summons Kangana Ranaut Her Sister Rangoli Chandel Asking Them To Appear Before Investigating Officer News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या