27 July 2024 10:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

Business Idea | केवळ 15 हजार रुपये गुंतवणुकीतून हा व्यवसाय सुरु करू शकता, महिन्याला 1 लाखांपर्यंत कमाई शक्य

Business Idea

Business Idea | व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया देत आहोत. या व्यवसायात तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याचीही गरज भासणार नाही. तुम्ही घरबसल्याही हा व्यवसाय सुरू करू शकता आणि चांगला नफा मिळवू शकता. हा व्यवसाय उत्तम साहित्याचा आहे. या व्यवसायाची व्याप्ती बरीच मोठी आहे.

या व्यवसायातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता:
जगभरात २ अब्ज टनाहून अधिक टाकाऊ पदार्थ तयार होतात. भारताबद्दल बोलायचे झाले तर २७७ दशलक्ष टनांपेक्षा जास्त जंक तयार होतो. सर्वात कठीण म्हणजे त्या मोठ्या प्रमाणातील टाकाऊ वस्तूंचे व्यवस्थापन करणे. अशा वेळी आपण टाकाऊ वस्तूंच्या वापर करून घरातील सजावटीसाठी अॅक्सेसरीज, दागिने, पेंटिंग्ज अशा वस्तू बनवू शकतो. रद्दी व्यवसायामुळे अनेक लोकांचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या बदललं आहे. आज लोक या व्यवसायातून लाखो रुपये कमवत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये आता करोडोचा व्यवसाय करणारे स्टार्टअप्स सुद्धा तयार झाले आहेत.

उपयोग कसा करावा :
टायरपासून खूप काही बनवता येतं. उदाहरणार्थ, आपण टायरपासून बसण्याची खुर्ची तयार करू शकता आणि आपण ती अॅमेझॉनमध्ये विकू शकता. याशिवाय कप, लाकडी कलाकुसर, किटली, चष्मा, कंगवा आणि होम डेकोरच्या वस्तू बनवू शकता. आपण ते फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांवर विकू शकता आणि आपण ते ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे विकू शकता.

टाकाऊ वस्तू कसा मिळवता येतात :
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, अनेक व्यावसायिक आजूबाजूच्या परिसातून चौकशी करून वस्तू गोळा करतात, त्यात काही फुकट तर काही अत्यंत अल्प दरात विकत घेतात.. अनेकजण थेट नगरपालिका किंवा महापालिकेकडून अशा टाकाऊ वस्तू घेत आहेत. त्यात अनेक ग्राहक स्वतःहून टाकाऊ वस्तू घरात अडचण नको म्हणून मोफत देऊन जातात. आपण त्यांच्याकडून त्या टाकाऊ वस्तू खरेदी किंवा मोफत घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही त्या टाकाऊ वस्तू स्वच्छ करून वस्तूंची वेगवेगळी डिझाईन्स बनवू शकता. युट्यूब वर साठी अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यातून कल्पना सुचू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Business Idea of waste material business check details 29 August 2022.

हॅशटॅग्स

#Business Idea(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x