1 May 2025 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Post Office Franchise | गाव-खेड्यापासून ते शहरात घराघराशी संबंधित सेवा, पोस्टाची एजंसी घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करा

Post Office Franchise

Post Office Franchise | नोकरी पेक्षा व्यवसाय उत्तम असं मत आज लाखो तरूणांच आहे. अनेक तरूण व्यवसायात मोठी झेप घेऊ पाहत आहेत. यासाठी काही जण स्वात: चा नविन ब्रॅंड लॉंन्च करतात. तर काही जण काही जण बाजारात मोठ्या प्रमाणावर प्रसिध्द असलेल्या ब्रॅंड्सची फ्रॅन्चायजी विकत घेतात. यातून मोठा नफा कमवतात. अशात पोस्ट ऑफिस नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या स्कीममुळे लोकप्रिय झाले आहे. अनेक व्यक्ती याचा वापर करत असतात. मात्र तुम्हाला माहित आहे का?   इतर ब्रॅंड प्रमाणे तुम्ही पोस्टाची फ्रॅन्चायजी विकत घेऊ शकता. हो हे खरं आहे. स्वत: चे काहीतरी नविन सुरू करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही पोस्टाच्या फ्रॅन्चायजीचा विचार नक्की करा. पण ही फ्रॅन्चायजी कशी घ्यायची आणि आपल्याला किती फायदा होणार असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील. तर या बातमीमधून या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवणार आहोत.

फ्रॅन्चायजी सुरू करण्यासाठीचे नियम
पोस्टाची फ्रॅन्चायजी सुरू करताना आधी तुमच्याकडे स्वत:ची जागा असायला हवी. तसेच यासाठी १८ वर्षांवरील व्यक्ती अर्ज करू शकतात. भारतातील कोणताही नागरिक पोस्टाची फ्रॅन्चायजी सुरू करू शकतो. तसेच यासाठी भरमसाठ शिक्षणाची अट नाही. अवघे ८ पर्यंतचे शिक्षण असले तरी तुम्ही यासाठी पात्र आहात.

किती टक्के नफा मिळणार आणि खर्च किती
पोस्टाच्या फ्रॅन्चायजीसाठी तुम्हाला फक्त ५००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यात नोंदणीकृत वस्तूंच्या बुकिंगसाठीसाठी तुम्हाला प्रत्येक व्यवहारात ३ रुपये कमिशन मिळेल. स्पीड पोस्ट प्रतिदेवाण-घेवाण यामध्ये कमिशन ५ रुपये आहे. मनी ऑर्डरसाठी देखील कमिशन मिळेल. मनी ऑर्डर १०० ते २०० रुपयांची असेल तर त्यावर साडेतीन रुपये कमिशन आहे. तर मनी ऑर्डर २०० रुपयांवर असेल तर ५ रुपये कमिशन. मनी ऑर्डरची कमीतकमी मर्यादा १०० रुपये आहे.

अतिरिक्त कमिशनची सुविधा
जर तुम्ही महिण्याला १००० नोंदणीकृत अणि स्पीड पोस्टाच्या बुकिंग केल्या तर त्यावर २० टक्के जास्तीचे कमिशन मिळेल. पोस्टाची तिकीटं आणि स्टेशनरी विक्रीवर ५ ट्क्के कमिशन निश्चित आहे. भर्ती शुल्क तिकीटं, महसुली शिक्के अशा सेवांसाठी ४० टक्के कमिशन देण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post Office Franchise Start with Low Investment check details 16 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Post Office Franchise(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या