 
						IRCTC Railway Ticket | रेल्वेने प्रवास करताना आपल्याकडे जिथे जायचे आहे त्या स्थानकाचे तिकीट असने फार महत्वाचे आहे. रेल्वे प्रवाससाठी सर्वजण आरक्षित तिकीट मिळण्याचा प्रयत्न करतात. मात्र सणासुदीच्या काळात आरक्षित तिकीट मिळणे कठीण असते. तिकीट नाही त्यामुळे अनेकांना आपला प्रवास रद्द करावा लागतो. मात्र आता रेल्वेने त्यांच्या नियमांत कमालीचा बदल केला आहे. हा बदल वाचून तुम्हीही खूप खुष व्हाल.
रेल्वेने प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेत प्रवाशांना एक मोठी सुट दिली आहे. यात तुम्ही तिकीट नसताना ट्रेनमध्ये जाऊ शकता. अनेकदा काही व्यक्ती आरक्षित तिकीट असूनही काही कारणास्तव प्रवास रद्द करतात. मात्र ते प्रवास रद्द करणार आहेत की नाही याची कोणाला काहीच माहिती नसते. अशा वेळी आपण ट्रेनमध्ये गेल्यावर आपल्याला ती जागा मिळवता येते.
रेल्वेने जाहिर केलेल्या नियमानुसार तुमच्याकडे प्रवासासाठी आरक्षित तिकीट नसेल तर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट काढले पाहिजे. प्लॅटफॉर्म तिकीट तुम्हाला रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये जाण्याची परवाणगी देते. यात प्रवास करत असताना तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये जाउ शकता. त्यानंतर ज्या ठिकाणी जायचे आहे त्याचे तिकीट टिसी कडून मिळवता येते.
जेव्हा तुम्ही असा प्रवास कराल तेव्हा ट्रेनमध्ये गेल्या बरोबर टिसीची भेट घ्या. त्याला तुमच्या प्रवासाची माहिती द्या. यावर टिसी तुम्हाला तुम्ही ज्या स्थानकाला ट्रेनमध्ये चढले आहात आणि तुम्हाला जिथे उतरायचे आहे तिथपर्यंतचे तिकीट लगेच काढून देतो. तसेच ट्रेनमध्ये अजिबात जागा नसेल तर तुम्हाला उभ्याने प्रवास करावा लागतो. जेव्हा एखादी जागा रिकामी असते तेव्हा तुम्हाला ती दिली जाते.
जर तुमच्याकडे आरक्षित तिकीट आहे आणि प्रवासही करायचा आहे. मात्र तुमची ट्रेन मिस झाली तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही बाय रोड पुढील स्टेशनवरून ट्रेन पकडू शकता. यात तुमच्या आरक्षित सिटला कोणीही काढून घेत नाही. टिसी पुढील तीन स्थानके वाट पाहतात. तोपर्यंत तुम्ही आल्यास तुम्हाला सिट मिळते. मात्र तीनही स्थानके तुम्ही आले नाही तर ती सिट दुस-या व्यक्तीला दिली जाते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		