
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस महिलांसाठी विविध बचत योजना राबवते. पोस्टाच्या योजना या सरकारी योजना असतात त्यामुळे ज्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या जोखीमेशी सामना करायचा नसेल त्यांच्यासाठी पोस्टाच्या सर्वच योजना फायदेशीर ठरू शकतात. दरम्यान महिलांसाठी देखील पोस्टअंतर्गत नवनवीन योजना राबवतात. यामधीलच एक महिलांच्या अत्यंत फायद्याची आणि दोन वर्षांच्या मॅच्युरिटीची योजना म्हणजे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र :
पोस्टअंतर्गत महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यामधीलच महिलांना व्याजदराने अधिक पैसा मिळवून देणारी आणि 2 वर्ष मॅच्युरिटी असणारी योजना म्हणजे पोस्टाची ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ योजना. योजनेचा कार्यकाळ 2 वर्षांचा असतो. केंद्र सरकारने 2023 साली ही नवी योजना सुरू केली आहे. ही योजना महिलांना एका वर्षात 7.5% एवढा व्याज प्रदान करते. त्याचबरोबर या योजनेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 2 वर्षांमध्ये 2 लाख रुपयांची रक्कम गुंतवू शकता.
खातं उघडण्यास कोण असेल पात्र :
ही योजना केवळ लहान मुलींसाठी आहे. म्हणजेच ज्या मुलींचं वय 10 वर्ष किंवा 10 वर्षापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी ही योजना पात्र आहे. त्याचबरोबर भारतात राहणारी कोणतीही महिला महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये पैसे गुंतवण्यास पात्र आहे.
टॅक्स सूटचा लाभ मिळतो :
महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं त्याचबरोबर प्रत्येक महिला आत्मनिर्भर बनावी यासाठी केंद्र सरकारने पोस्टाची ही योजना सुरू केली आहे. आतापर्यंत बऱ्याच महिलांनी या योजनेचा लाभ उचलला आहे. महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये TDS कापला जात नाही. परंतु तुमचे व्याजदर 40 te 50,000 रुपयांपर्यंत गेले तर तुमच्याकडून टॅक्स वसुलले जातात.
अशा पद्धतीने मिळेल लाखोंची रक्कम :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पोस्टमध्ये जाऊन महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेटचं खातं उघडून घ्यावे लागेल. त्याचबरोबर 2 वर्ष 2 लाखाची रक्कम गुंतवली तर, तुम्हाला एकूण 32,044 एवढी रक्कम व्याजाची मिळेल. म्हणजेच मॅच्युरिटीवर तुम्ही 232044 रुपये मिळवाल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.