 
						IRCTC Ticket Booking | आपल्या भारतामध्ये दिवाळी हा सण अगदी थाटामाटात साजरा केला जातो. यासाठी घरापासून दूर राहणारे विद्यार्थी, किंवा कामानिमित्त वेगवेगळ्या शहरांत राहणारे इतर व्यक्ती दिवाळीच्या सीझनमध्ये मात्र आपल्या घरी परतण्याचा आणि आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी सर्वात पहिले रेल्वेचे तिकीट बुक करून आपली हक्काची सीट मिळवावी लागते. जेणेकरून प्रवासादरम्यान आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.
या फेस्टिव सिझनमध्ये घरी परतणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. त्यामुळे तात्काळ तिकीट बुक केल्यावर ते उपलब्ध होत नाही. गर्दी आणि लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. तुम्हाला सुद्धा दिवाळी सणासाठी तुमच्या घरी परतायचं असेल आणि ऐन वेळेला तात्काळ तिकीट उपलब्ध झाले नसेल तर, चिंता करण्याची काहीही गरज नाही. रेल्वेने तुमच्यासाठी एक ऑप्शन ठेवले आहे. ज्याचे नाव करंट तिकीट ऑप्शन असे आहे.
रिझर्वेशन चार्टमधून करता येईल करंट तिकीट बुक : 
एखाद्या प्रवाशाला एकही तिकीट मिळाले नाही तर तो रिझर्वेशन चार्टमधून करंट तिकीट बुक करू शकतो. सामान्य तिकिटासाठी रेल्वे तीन महिन्यांआधीच तिकीट बुकिंग ओपन करते. अशातच तात्काळ तिकिटाची सुविधा रेल्वेच्या तारखेच्या एक दिवसाची सुरू करण्यात येते. समजा एखादा व्यक्तीला सामान्य आणि तात्काळ दोन्हीही तिकीट उपलब्ध झाली नाही तर, तो करंट तिकीट बुक करू शकतो.
अशा पद्धतीने करा आयआरसीटीसी ॲपवरून करंट तिकीट बुक :
1) सर्वप्रथम आयआरसीटीसी उघडा नंतर तुमच्या क्रेडेन्शिअलचा उपयोग करून लॉगिन करून घ्या.
2) पुढे ट्रेन नावाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं डेस्टिनेशन त्याचबरोबर सोर्स स्टेशन टाईप करायचा आहे.
3) तारीख टाकताना तुम्ही ज्या दिवशी तिकीट बुक करत आहात त्याच दिवशीची करंट तिकीट बुकिंगची तारीख असावी. म्हणजे तुम्ही 14 ऑक्टोबर 2024 या दिवशी करंट तिकीट बुक केलं असेल तर, तुमच्या प्रवासाची तारीख देखील हीच असली पाहिजे.
4) वरील सांगितल्याप्रमाणे सर्व प्रोसेस करून झाल्यानंतर ट्रेन शोधा अशा पद्धतीचं एक ऑप्शन मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही निवडलेल्या रूटवर सर्व ट्रेनची लिस्ट समोर येईल. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची सीट बुक करू शकता.
तिकीट बुक करण्यासाठी वापरले जातात एकूण 3 पर्याय :
1) करंट तिकीट :
प्रवाशांसाठी करंट तिकीट बुकिंगची सुविधा ट्रेन सुरू व्हायच्या चार तासांआधी केली जाते. करंट तिकीट बुक करण्याची परवानगी रेल्वेने केलेल्या चार्टिंगनंतर उपलब्ध होते.
2) तात्काळ तिकीट :
तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला ट्रेन सुरू होण्याच्या एक दिवस आधी बुक करावे लागते. यामध्ये तुम्ही एसी क्लास 2A/3A/CC/EC /3E या बर्थकरिता तुम्हाला 10 वाजता तर, नॉन एसी क्लाससाठी 11 वाजता तात्काळ तिकीट बुक करता येतं. समजा एखादी ट्रेन स्टेशनवरून 2 ऑक्टोंबरला सुरुवातीपासून रवाना होणार आहे तर, तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी सकाळी 10 वाजल्यापासूनच तिकीट बुक करायला सुरुवात होईल. त्याचबरोबर नॉन एसी क्लासचं तिकीट बुक करण्यासाठी 11 वाजता सुरू होईल.
3) सामान्य तिकीट :
सामान्य तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही IRCTC च्या माध्यमातून 3 महिन्यांआधीच तिकीट बुक करू शकता.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		