
Post Office Scheme | बहुतांश व्यक्ती आपल्या पैशांची गुंतवणूक करण्यासाठी बँकेला एकदम बेस्ट पर्याय मानतात. परंतु पोस्टाच्या अंतर्गत सर्व नागरिकांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी पोस्टाच्या अनेक योजना राबविल्या जातात. पोस्टाच्या योजना सुरक्षित तर असतातच सोबतच चांगले व्याजदर मिळवून देण्यासाठी पोस्टाच्या अनेक योजना लोकप्रिय ठरल्या आहेत.
आज आम्ही तुम्हाला 100% गॅरंटी असणाऱ्या पोस्टाच्या एका FD योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेचं नाव पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट असं आहे. या योजनेमध्ये वेगवेगळ्या टेन्योरच्या FD साठी ऑप्शन मिळतात. त्याचबरोबर ही योजना इन्कम टॅक्स कलम 80C अंतर्गत टॅक्स सुविधा देखील प्रदान करते. एवढेच नाही तर, 5 वर्षांच्या एफडीवर 7.5% व्याजदर देखील मिळते. या योजनेमध्ये तुम्ही 10 लाखांची गुंतवणूक केली असता एक्सटेंड रूलनुसार तुम्ही तब्बल 30 लाखांपर्यंत पैसे जमा करू शकता.
जाणून घ्या एक्सटेंड रूल :
पोस्टाच्या एक वर्षाच्या FD ला मॅच्युरिटी होण्याच्या 6 महिन्यांआधीच एक्सटेंड केले जाऊ शकते. स्कीम एक्सटेंड करणे म्हणजे तुमची योजना पुढे अधिक कालावधीसाठी वाढवून गुंतवणूक सुरू ठेवणे. या हिशोबाने 2 वर्षांच्या एफडीला मॅच्युरिटी पिरियड पूर्ण होण्याच्या 12 महिनेआधी एक्सटेंड केले जाऊ शकते. त्याचबरोबर 3 ते 5 वर्षांच्या एफडीला मॅच्युरिटी पिरियड होण्याआधी 18 महिने पहिलेच पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सूचना द्यावी लागेल. तुम्ही योजनेच्या मॅच्युरिटी पिरियडनंतर देखील अकाउंट एक्सटेंड करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकता.
किती वेळा वाढवावा लागेल एक्सटेंट रूल :
पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेला पोस्ट ऑफिस एफडी असं देखील म्हटलं जातं. तुम्हाला पोस्टाच्या एफडीमधील रक्कम 3 पटीने वाढवायची असेल तर, तुम्हाला 5 वर्षांच्या मॅच्युरिटी टाईमची योजना घ्यावी लागेल. यासाठी तुम्हाला ही योजना दोन वेळा एक्सटेंड करावी लागेल. म्हणजेच एकूण 15 वर्षांपर्यंत योजना सुरू राहिली तरच 10 लाखांची तिप्पट रक्कम 30 लाख एवढा फंड जमा करता येईल.
जाणून घ्या कॅल्क्युलेशन :
समजा तुम्ही 5 वर्षांच्या टाईम डिपॉझिटवर 7.5% व्याजदराने 10 लाख रुपये गुंतवले असतील तर, 5 वर्षांच्या हिशोबाने फक्त व्याजाची रक्कम 4,49,984 एवढी जमा होते. म्हणजेच एकूण अमाउंट 14,49,984 एवढी मोठी रक्कम तुमच्या खात्यात जमा राहते.
त्याचबरोबर तुम्ही आणखीन 5 वर्षांसाठी स्कीम एक्सटेंड केलीत तर, व्याजाची रक्कम 11,02,349 रुपये जमा होतील. म्हणजेच 10 वर्षानंतर तुमच्या खात्यात एकूण रक्कम 21,02,349 रुपये जमा होतील.
पुढे आणखीन 5 वर्षांसाठी स्कीम एक्सटेंड केली तर, 10 लाखांच्या गुंतवणुकीचे एकूण 15 वर्ष पूर्ण होतील. लागू केलेल्या व्याजदराच्या हिशोबाने तुमच्या खात्यात व्याजाची 20,48,297 एवढी रक्कम जमा होईल. तर, एकूण कॅल्क्युलेशन पाहिलं आणि संपूर्ण मॅच्युरिटी पिरियडची रक्कम काढली तर, 30,48,297 एवढी मोठी रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.