Tax Saver Mutual Fund | टॅक्स भरता? हे आहेत टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड, 3 वर्षांत मजबूत परतावा प्लस टॅक्स सूट, डिटेल चेक करा
Tax Saver Mutual Fund | चालू आर्थिक वर्ष 2022-23 संपत आला आहे. आर्थिक वर्ष अखेरीस लोकांनी कर बचतीचे विविध पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. मात्र लोक गुंतवणूक बाजारात कर बचत करण्याचे साधन म्हणून खूप क्वचित पाहतात. गुंतवणूक बाजारात असेल अनेक, ‘ELSS’ किंवा ‘इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम’ आहेत, जे उत्तम कर बचत साधन म्हणून ओळखले जाते. ‘ELSS’ किंवा ‘इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम’ चांगल्या परताव्यासह कर बचत लाभ ही मिळवून देतात. ‘कोटक टॅक्स सेव्हर स्कीम’ असाच लाभ मिळवून देणारा एक म्युचुअल फंड आहे. चला तर मग जाणून घेऊ या योजनेचे पूर्ण तपशील. (The Current Net Asset Value of the Kotak Tax Saver Regular Plan as of Jan 10, 2023 is Rs 76.22 for Growth option of its Regular plan)
‘कोटक टॅक्स सेव्हिंग स्कीम’ ही योजना कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडाची ELSS फंड योजना आहे. या फंडाची नियमित योजना 23 नोव्हेंबर 2005 रोजी आणि थेट योजना 1 जानेवारी 2013 रोजी लॉन्च करण्यात आली होती. या फंडामध्ये 98.69 टक्के वाटा इक्विटीचा आहे, तर उर्वरित गुंतवणूक वाटा 1.31 टक्के रोख साधनांमध्ये आहे.
फंडाचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट :
‘कोटक टॅक्स सेव्हिंग स्कीम’ फंडाचे उद्दिष्ट इक्विटी आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणे आणि गुंतवणूकदारांना नियमांनुसार आयकर सवलत मिळवून देणे हे योजनेचे मुख्य गुंतवणुकीचे उद्दिष्ट आहे. या योजनेतील गुंतवणुक आयकर कायदा कलम 80C अंतर्गत करमुक्त आहे. या योजनेत गुंतवणूक करून कर कपातीचा लाभ घेण्यासाठी फंड युनिट वाटप केल्याच्या तारखेपासून 3 वर्षांचा अनिवार्य लॉक-इन कालावधी देण्यात आला आहे. या योजनेतील पैसे मुख्यतः वेगवेगळ्या बाजार भांडवलाच्या कंपन्यांमध्ये आणि विविध क्षेत्रांमध्ये लावले जातात.
कोटक टॅक्स सेव्हर योजनेत गुंतवणुकीचा दृष्टीकोन :
ही टॅक्स सेवर योजना फ्लेक्सी कॅप पध्दतीचा अवलंब करते, आणि बाजार भांडवलीकरणाच्या बाबतीत कोणाचीही बाजू घेत नाही. या योजनेने सर्वसमावेशक गुंतवणूक धोरण अवलंबले आहे. जे टॉप-डाउन थीमॅटिक आच्छादनासह बॉटम-अप स्टॉक निवडीवर भर देतात. या योजनेतील पैसे अनेक क्षेत्रांमध्ये आणि कंपन्यांमध्ये गुंतवणुक करून विविधीकरणाद्वारे जोखीम व्यवस्थापित केली जाते.
SIP गुंतवणुकीवर परतावा : या फंडाने मागील 1 वर्षात आपल्या SIP गुंतवणुकदारांना खालीलप्रमाणे परतावा कमावून दिला आहे.
* 1 वर्षात : 6.87 टक्के,
* 2 वर्षात : 14.19 टक्के,
* 3 वर्षात : 36.40 टक्के,
* 5 वर्षात : 57.93 टक्के,
* 10 वर्षात : 138.10 टक्के
गुंतवणुकीवर परतावा : या Tax Sever फंडाने मागील आपल्या गुंतवणुकदारांना खालील प्रमाणे परतावा कमावून दिला आहे.
* 1 वर्षात : 5.30 टक्के ,
* 2 वर्षात : 19.12 टक्के,
* 3 वर्षात : 19.38 टक्के,
* 5 वर्षात : 13.26 टक्के,
* 10 वर्षात : 15.36 टक्के
दीर्घकालीन SIP वर सरासरी वार्षिक परतावा :
* 1 वर्षात : 12.91 टक्के,
* 2 वर्षात : 13.29 टक्के,
* 3 वर्षात : 21.20 टक्के,
* 5 वर्षात : 18.31 टक्के,
* 10 वर्षात : 16.53 टक्के.
या योजनेच्या टॉप होल्डिंग्समध्ये अनेक दिग्गज कंपन्याचे नाव सामील आहे. या योजनेतील जास्तीत जास्त रक्कम ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो, ITC, मारुती सुझुकी इंडिया, SRF आणि अंबुजा सिमेंट्स यासारख्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tax Saver Mutual Fund scheme for investment and Tax Benefits on 12 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या