15 March 2025 3:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर एनर्जी स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईससह BUY रेटिंग जाहीर - NSE: SUZLON Bonus Share News l खुशखबर, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, पोर्टफोलिओ मजबूत करा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, मिळेल मोठा परतावा - NSE: TATAMOTORS IRB Infra Share Price | शेअर प्राईस 42 रुपये, शेअरमध्ये 56% अपसाईड तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स चार्टवर अपसाईड तेजीचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Infosys Share Price | मॉर्गन स्टॅनली IT शेअरवर बुलिश, मिळणार मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: INFY
x

IRCTC Ticket Booking Down | डोक्याला ताप! सुट्टीत रेल्वेचं तिकीट मिळेना, त्यात IRCTC ऑनलाईन ई-तिकीट बुकिंग सेवा ठप्प

IRCTC Ticket Booking Down

IRCTC Ticket Booking Down | आयआरसीटीसीच्या ई-तिकीट बुकिंग वेबसाइट आणि अॅपची सेवा ६ मे रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेचे आरक्षण करण्यात मोठी अडचण येत आहे. मे आणि जून ला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने प्रवाशांना तिकीट बुक करता येत नव्हते. तात्काळ तिकीट बुक करण्याची वेळ सकाळी १० ते ११ अशी आहे. त्यामुळे रेल्वे आरक्षण करताना प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतंय.

वेबसाईट आणि अ ॅपमधील समस्येमुळे तात्काळ तिकीट काढणाऱ्या प्रवाशांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. अनेक युजर्सनी सोशल मीडियाप्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तिकीट बुकिंगमध्ये अडचण येत असल्याची तक्रार केली आहे.

सेवा पुन्हा पुन्हा बाधित होतेय
सध्या आयआरसीटीसी अॅप आणि वेबसाईटवर लॉग इन करता येते आणि रेल्वे तिकिटे बुक करण्याचा ही पर्याय आहे. मात्र आयआरसीटीसी आणि भारतीय रेल्वेकडून या सेवेतील समस्येबाबत कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही.

यापूर्वी अनेक युजर्सनी आयआरसीटीसी अॅप आणि वेबसाइटमधील समस्येबद्दल ट्विटरवर पोस्ट केली होती. पंकज सिंह नावाच्या एका युजरने या समस्येचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला आणि लिहिले की, “आयआरसीटीसीच्या माध्यमातून एकही तिकीट बुक करता येत नाही. कंपनी बंद करावी.

बुकिंगवेळी रात्रीपासून अडचण :
एका युजरने रात्री 11 वाजून 36 मिनिटांनी ट्विटरवर पोस्ट केली की, गेल्या 36 मिनिटांपासून त्याला अॅपमध्ये लॉग इन करण्यात त्रास होत आहे. वेबसाईट आणि अ ॅप्स आदींच्या सेवेवर लक्ष ठेवणाऱ्या डाऊनडिटेक्टर या वेबसाईटनेही आयआरसीटीसीची वेबसाईट डाऊन असल्याची पुष्टी केली आहे. हजारो युजर्सनी आयआरसीटीसीच्या सेवेतील बिघाडाची तक्रार केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IRCTC Ticket Booking Down check details on 06 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IRCTC Ticket Booking Down(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x