14 July 2024 7:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | IREDA शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक मध्ये तुफान तेजी येण्याचे संकेत Sonata Software Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर खरेदी करा, यापूर्वी दिला 7950% परतावा, श्रीमंत होऊ शकता Railtel Share Price | हा PSU शेअर मालामाल करतोय, शॉर्ट टर्म मध्ये 5 पट परतावा दिला, संधी सोडू नका Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरवर होणार पॉझिटिव्ह परिणाम NBCC Share Price | NBCC सहित हे 3 मल्टिबॅगर शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, मिळेल मजबूत परतावा Inox Wind Share Price | पटापट कमाईची संधी! यापूर्वी 1700% मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर श्रीमंत करणार TCS Share Price | तज्ज्ञांकडून TCS शेअरसाठी BUY रेटिंग, मालामाल करणार शेअर, पुढची टार्गेट प्राइस नोट करा
x

IRCTC Tour Package | रामेश्वरम आणि मदुराईसह केरळला भेट देण्याची उत्तम संधी, या सर्व सुविधा मिळतील

IRCTC Tour Package

IRCTC Tour Package | जर तुम्हाला विमानानं दक्षिण भारतात जायचं असेल तर आयआरसीटीसीनं तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज आणलं आहे. 8 दिवसांच्या या हवाई दौऱ्याची सुरुवात जयपूरहून संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. या पॅकेजदरम्यान मदुराई, रामेश्वरम, कन्याकुमारी, तिरुअनंतपुरम, कुमारकोम, मुन्नार आणि कोचीला भेट दिली जाणार आहे. या एअर टूर पॅकेजचे भाडे प्रति व्यक्ती ४९,५५० रुपयांपासून सुरू होते.

8 दिवसांच्या या हवाई दौऱ्याची सुरुवात जयपूरहून संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. या सर्व ठिकाणांना भेट दिल्यानंतर पर्यटकांना विमानाने पुन्हा जयपूरला आणण्यात येणार आहे. या पॅकेजच्या माध्यमातून मीनाक्षी अम्मान मंदिर, श्री कन्या कुमारी भगवती अम्मान मंदिर अशा अनेक मंदिरांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय केरळचं सौंदर्य पाहण्याची संधीही मिळणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची चिंता करण्याची गरज नाही. नाष्टा आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा उपलब्ध असेल. सर्वत्र रात्रीच्या वेळी हॉटेल मुक्कामाची सोय करण्यात येणार आहे.

टूर पॅकेजचे ठळक मुद्दे :
* डेस्टिनेशन कव्हर- मदुरै, रामेश्वरम, कन्याकुमारी, तिरुवनंतपुरम, कुमारकोम, मुन्नार और कोच्ची
* पॅकेजचे नाव: Rameshwaram Madurai With Kerala EX Jaipur (NJA06)
* किती दिवसांचा असेल दौरा – 7 रात्री आणि 8 दिवस
* जेवणाची योजना – नाश्ता आणि रात्रीचे जेवण
* ट्रॅव्हल मोड – फ्लाइट
* प्रस्थान दिनांक : २०२२ साली १२ सप्टेंबर, १२ ऑक्टोबर, ७ नोव्हेंबर, १९ डिसेंबर आणि २६ डिसेंबर
* २०२३ मध्ये १६ जानेवारी आणि १६ फेब्रुवारी

बुकिंग कसे करावे :
या एअर टूर पॅकेजसाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर www.irctctourism.com जाऊन ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. याशिवाय आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिसेस आणि रिजनल ऑफिसेसच्या माध्यमातूनही बुकिंग करता येणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IRCTC Tour Package from Jaipur to Madurai Rameshwaram Kanyakumari Trivandrum Kumarakom Munnar Kochi package details 21 August 2022.

हॅशटॅग्स

#IRCTC Tour Packages(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x