
Platform Tickets Price | सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबईतील अनेक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमतीत वाढ केली आहे. तिकिटांमधील ही वाढ तात्पुरती आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या स्थानकांवरील गर्दी टाळण्यासाठी सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, एलटीटी आणि पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकीटाचे भाडे १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले आहे. या वाढीव किमती २२ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत लागू असतील.
उत्तर रेल्वे
याआधी उत्तर रेल्वेनेही प्लॅटफॉर्मवरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमतीत तिप्पट वाढ केली आहे. नवी दिल्ली, जुनी दिल्ली, सराय रोहिल्ला, हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद आणि आनंद विहारसह सर्व प्रमुख स्थानकांवर ५ ऑक्टोबर २०२२ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत या वाढीव किंमती लागू असतील. यामध्ये 10 रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 30 रुपये करण्यात आली आहे. यासोबतच उत्तर रेल्वेने लखनऊ विभागातील प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांमध्येही वाढ केली आहे.
दक्षिण रेल्वे
याआधी दसऱ्याच्या मुहूर्तावर दक्षिण रेल्वेनेही प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर 10 रुपयांवरून 30 रुपये केले होते. ही वाढीव किंमत पुढील वर्षी १ ऑक्टोबर ते ३१ जानेवारी या कालावधीत लागू असेल. यामध्ये तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रल, चेन्नई एग्मोर, तांबाराम, कटपाडी, चेंगलपट्टू, अरक्कोनम, तिरुवल्लूर, आवाडी आणि विजयवाडा स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने 2015 पासून प्लॅटफॉर्म तिकीट दर ठरवण्याचे अधिकार विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना दिले असल्याने ऐन सणासुदीच्या काळात रेल्वे स्थानकांवरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यापूर्वी रेल्वेकडून अशी पावले उचलण्यात आली आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.